Download App

अजितदादांनी दिल्ली टाळली? जीएसटी कौन्सिलच्या बैठकीला दांडी मारुन रमले नाशिक दौऱ्यात

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्ली दौरा टाळला असल्याचे समोर आले आहे. काल (7 ऑक्टोबर) दिल्लीत (Delhi) केंद्रीय अर्थविभागाची जीएसटी कौन्सिलची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सर्व राज्यांचे अर्थमंत्री आणि अर्थ उपस्थित असतात. पण या बैठकीला उपस्थित न राहता अजित पवार नाशिक दौऱ्यावर होते. त्यांनी या बैठकीला आपल्याऐवजी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना पाठवून दिले होते. त्यामुळेच पवार यांनी दिल्ली दौरा टाळला का? असा सवाल विचारला जात आहे. (DCM Ajit Pawar preferred to visit Nashik instead of attending the GST Council meeting in Delhi)

मागील काही दिवसांपासून अजित पवार यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी टाळल्या असल्याचं दिसून आलं आहे. मागील काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर होते. याशिवाय केंद्रीय अर्थमंत्री अमित शाह हेही गणेशोत्सवादरम्यान मुंबईत आले होते. शाह यांनी त्यांच्या दौऱ्यात ‘सागर’ बंगल्यावर आणि ‘सह्याद्री अतिथीगृहात’ मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली होती.

Rohit Pawar : ‘अख्खा महाराष्ट्र भिकारी होईल पण, सावंत’.. रोहित पवार असं का म्हणाले?

मात्र यावेळी पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याचे सांगत अजित पवार बारामती दौऱ्यात होते. त्यावेळी अजित पवार बारामतीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्य रुग्ण कक्षाच्या (अपघात विभाग) उद्घाटनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. आता पुन्हा त्यांनी दिल्ली दौरा आणि महत्वाची जीएसटी कौन्सिलची बैठक टाळून पूर्वनियोजित नाशिक दौऱ्याला महत्व दिले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर दिल्ली दौऱ्यावरुन होणारी टीका पाहता त्यांनी त्यांचा दौरा टाळला असल्याचे बोलले जाते.

आमचा डीएनए तपासायच्या आधी स्वत:चा डीएनए तपासा, तुमचा डीएन फिरोज…; अनिल बोंडेंची टीका

जुलैमध्ये झाली होती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट :

जुलै महिन्यात भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएतील सर्व पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल दिल्लीला गेले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांच्याशी त्यांची बंद दाराआड बराच वेळ चर्चा झाली होती. त्यानंतर अजित पवार दिल्लीला गेलेले नाहीत.

follow us