Download App

वाहन धारकांना दिलासा! वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यास ‘या’ दिवशी पर्यंत मुदतवाढ

vehicles मालकांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

Deadline for installing high security registration plates on vehicles extended: राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी 31 मार्च 2025 पर्यंत वाहन मालकांना मुदत देण्यात आली होती. आजपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्याचे काम कमी झाले असल्याने उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

पुण्यातील साईभक्तांची श्रद्धा! साईचरणी अर्पण केला साडेचार लाखांचा सोन्याचा हार

1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या जुन्या वाहनांना ही पाटी बसविण्याकरिता 3 संस्थाची /उत्पादकांची परिवहन विभागामार्फत निवड केली आहे. तरी संबंधित वाहन मालकांनी याची नोंद घेऊन 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी असलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यात यावी, असे आवाहन परिवहन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

…म्हणून चालकानेच बस पेटवून घेतला चौघांचा बळी, हिंजवडी बस आग दुर्घटनेबद्दल धक्कादायक कारण समोर

तर या प्रकरणाबाबत सांगायचं झालं तर सर्वोच्च न्यायालयाने सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र वाहनधारकांनी अद्याप देखील या आदेशाचे पालन केलेलं नव्हतं. तसेच अनेकांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे या पाट्या बसवल्या गेल्या नव्हत्या. मात्र परिवहन विभाग ह्या पाट्या बसवण्यासाठी मुदत वाढ दिली आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच 1 एप्रिल 2019 नंतर खरेदी केलेल्या वाहनांवर उत्पादकांमार्फतच अशा प्रकारची पाटी बसवण्यात आल्यामुळे त्या वाहनधारकांना ही पाटी पुन्हा बसवण्याची गरज नाही.

follow us