Death increse in Ahmedabad plane crash; 34 people die in medical college : संपूर्ण देशासाठी 12 जून हा काळा दिवस ठरला आहे. अहमदाबादमध्ये (Ahmedabad plane crash) एका विमानाचा अपघात झाला अन् क्षणात सगळं काही होत्याचं (Ahmedabad Plane Crash) नव्हतं झालं. विमानातील एकूण 241 लोकांच्या मृत्यूने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. मात्र या घटनेमध्ये अद्यापही मृत्यू थांबताना दिसत नाहीयेत. या घटनेमध्ये मृतांचा आकडा आता 275 वर गेला आहे. कारण यामध्ये ज्या बीजे मेडिकल कॉलेजवर हे विमान कोसळलं तेथील 34 जणांचा मृत्यू झाला आहे.
गुजरातच्या अहमदाबाद (Ahmedabad plane crash) येथील मेघानी नगर परिसरात 12 जून गुरुवारी दुपारी 1.30 च्या सुमारास एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले. ज्या इमारतीला हे विमान धडकले. ती इमारत गुजरातमधील आघाडीचे वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या बीजे मेडिकल कॉलेजच्या मुलांचे वसतिगृह होते. त्यामुळे विमानातील प्रवाशांसह या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, डॉक्टर आणि इतर लोक असे 60 जण उपस्थित होते. त्यापैकी 34 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे या घटनेमध्ये मृतांचा आकडा आता 275 वर गेला आहे.
त्यामुळे या मृतांची (Ahmedabad plane crash) ओळख पटवण्यासाठी आता DNA टेस्ट केली जाणार आहे. मात्र, ही चाचणी कशीकेली जाते त्यात नेमके किती टप्पे असतात याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. ही DNA टेस्ट (DNA Test) गुजरातच्या फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आणि नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटीमध्ये केली जाणार आहे.
डीएनए म्हणजे काय ?
डीएनए (डीऑक्सीरिबोन्यूक्लिक अॅसिड) (Ahmedabad plane crash) हा एक जैविक अणू आहे, जो प्रत्येक सजीव प्राण्याच्या पेशींमध्ये आढळतो. तो एक प्रकारचा अनुवांशिक कोड आहे. जो आपल्या शरीराची प्रत्येक वैशिष्ट्ये ठरवतो. जसे की आपल्या डोळ्यांचा रंग, केसांची पोत, लांबी आणि काही रोगांना आपली संवेदनशीलता. हे देखील डीएनएद्वारे निश्चित केले जाते. आपल्याला आपल्या पालकांकडून डीएनए वारशाने मिळतो आणि तो आपल्या ओळखीचा आधार आहे.