Ahmedabad plane crash नंतर विमानाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; प्रवासाअगोदर असं चेक करा तुमच्या विमानाचं वय अन् सेफ्टी

Question mark after Ahmedabad plane crash Check age and safety of aircraft before travelling : संपूर्ण देशासाठी 12 जून हा काळा दिवस ठरला आहे. अहमदाबादमध्ये (Ahmedabad plane crash) एका विमानाचा अपघात झाला अन् क्षणात सगळं काही होत्याचं (Ahmedabad Plane Crash) नव्हतं झालं. विमानातील एकूण 265 लोकांच्या मृत्यूने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. अपघातनंतर आता विमान प्रवासाच्या सुरक्षेवर आणि त्याचं वय म्हणजे विमानाची निर्मिती कधी झालेली आहे? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मात्र या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या विमान प्रवासा अगोदरच चेक करू शकता आणि तुमच्या सुरक्षेची खात्री करू शकता. हे सर्व कसं तपासायचं जाणून घेऊ सविस्तर…
प्रवासाअगोदर असं चेक करा तुमच्या विमानाचं वय अन् सेफ्टी
तुम्हाला जर विमान प्रवास करायचा आहे. तुमच्या विमान प्रवासामध्ये तुमच्या सुरक्षेची खात्री करून घ्यायची आहे. त्यासाठी तुम्ही काही गोष्टी चेक करू शकता. ज्यामध्ये तुमच्या विमानाचं वय म्हणजे त्याची निर्मिती कधी झाली आहे? ते किती जुनं आहे? त्याचबरोबर हे विमान किती सुरक्षित आहे? या सर्व गोष्टी तुमच्या विमान प्रवासाच्या तिकीटावर नमूद केलेल्या असतात.
दिवाळीनंतर उडणार राजकीय धुराळा! निवडणूक तयारीचा मुहू्र्त ठरला
आपल्यापैकी अनेकांना या गोष्टी माहिती नसतात. मात्र या सर्व गोष्टी संबंधित कंपनीने त्या-त्या प्रवाशाच्या तिकीटावर जाहीरपणे नमूद केलेल्या असतात. तुम्ही त्या तपासून घेऊ शकता.यासाठी तुम्ही तुमच्या तिकिटावर किंवा विमान कंपनीकडून आलेल्या एसएमएसवर जाऊ शकता.
तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात? इस्रायल-इराण आमने-सामने, सूडयुद्धाचा इशारा …
– ज्यावर एआय-185 (एअर इंडिया) किंवा 6 इ- 211 (इंडिगो) अशा प्रकारचे नंबर असू शकतात. जो तुमच्या फ्लाईटचा नंबर असतो. याचवेळी तुम्ही डिपार्चर डेट देखील तपासा.
धो-धो पावसाचा इशारा! रायगड-रत्नागिरी धोक्याच्या झोनमध्ये, घाटमाथ्यासाठी पुढील 48 तास महत्वाचे
– त्याचबरोबर तुम्ही फ्लाईट ट्रॅकिंग वेबसाईट देखील चेक करू शकता. ज्यामध्ये flightaware.com , flightradar24.com ,
planespotters.net, यापैकी कोणत्याही वेबसाईटवर गेल्यास. त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या फ्लाईटचा नंबर टाकावा लागतो. त्यानंतर तुमची सर्व माहिती त्या ठिकाणी दिसते.जसे की, एअरक्राफ्ट मॉडेल, रजिस्ट्रेशन नंबर, एअरक्राफ्ट एज,
‘या’ राशींच्या लोकांना आज मिळणार नवीन संधी, भरपूर फायदे होणार
– त्यानंतर तुम्ही एअरक्राफ्ट हिस्टरी तपासायची आहे. त्यासाठी वेबसाईटवर रजिस्ट्रेशन असं सर्च केल्यानंतर तुम्हाला त्या विमानाचा वय म्हणजे त्याची निर्मिती कधी झाली आहे? जर विमान दुसऱ्या कंपनीने घेतले असेल तर पहिली कंपनी किंवा मालक कोण होतं? ही माहिती मिळते.
दादासाहेब फाळके चित्रनगरीला ‘पीएसयू लीडरशीप अँड एक्सेलन्स’ पुरस्कार जाहीर
– विमानाच्या वया बद्दल सांगायचं झालं. तर एखादं विमान हे त्याच्या निर्मितीनंतर 15 ते 20 वर्ष सुरक्षित असते. पण ते कमी कार्यक्षम किंवा कमी आरामदायी देखील झालेलं असू शकतं.
अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन अन् व्हेज-नॉनव्हेज हॉटेल मालकांना कारवाईचा इशारा
-वयानंतर आता तुम्ही तुमच्या विमानाची सेफ्टी रेकॉर्ड चेक करू शकता. यासाठी गुगलवर तुमच्या विमानाच्या कंपनीचे नाव टाकून डिजीसीएने केलेलं त्याच सेफ्टी ऑडिट तपासायचं आहे. ज्यामध्ये तुम्हाला ऑडिट रिपोर्ट, आकारलेला दंड, त्यावर विमान कंपनीला मिळालेल्या नोटीस हे सर्व तपासता येतं.
IND vs NZ मालिकेसाठी मुंबई अन् अहमदाबादला नकार, BCCI चा मोठा निर्णय, ‘या’ 8 शहरांमध्ये होणार सामने
– त्यामध्ये इंडिगो, विस्तारा या कंपन्यांचं रेकॉर्ड चांगलं आहे. तर स्पाइसजेट, गो फर्स्ट यांना 2022-24 मध्ये त्यांच्यातील कमतरतांसाठी डिजीसीएने इशारा दिला आहे.
– ही माहिती तुम्हाला असायला हवी. मात्र याची भीती बाळगण्याची गरज नाही. कारण शेवटी माहिती हे एक अशी शक्ती असते.जी मनाला शांती देते. विमान प्रवास जरी सुरक्षित असला तरी या सर्व माहितीवरून तुम्हाला या विमानाचा पायलट व्हायचं नाही. मात्र तुम्हाला तुमच्या विमान प्रवासाची सुरक्षेची खात्री मिळते एवढे नक्की.