Download App

‘दक्षिण भारत वेगळा देश जाहीर करा’; अर्थसंकल्पानंतर काँग्रेस खासदाराची अजब मागणी

Image Credit: Letsupp

D.K.Suresh : दक्षिण भारत वेगळा देश जाहीर करा, अशी मागणी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे बंधू काँग्रेस खासदार डीके सुरेश (D.K. Suresh) यांनी केली आहे. निधीच्या मुद्द्यावर बोलताना डीके सुरेश यांनी संताप व्यक्त केला आहे. आमच्या वाट्याचा निधी उत्तरेतील राज्यांकडे वळवला जात असून दक्षिणेकडी राज्यांवर केंद्र सरकारकडून असाच अन्याय सुरु ठेवला तर आम्ही वेगळ्या राष्ट्राची मागणी करणार असल्याचा पवित्रा डीके सुरेश यांनी केला आहे. डीके सुरेश यांच्या मागणीनंतर भाजपच्या नेत्यांकडून हल्लाबोल करण्यात येत आहे.

दुहेरी हत्याकांड! वकिलांच्या मागणीवर फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले…

डीके सुरेश म्हणाले, आमच्या राज्याकडून घेतलेला पैसा आमच्याच राज्यासाठी खर्च केला असतं तर चाललं असतं. दक्षिणेतील राज्यांकडून जीएसटी, प्रत्यक्ष कर, जकातीच्या माध्यमातून गोळा होणआरा पैसा आमच्या राज्यांपर्यंतही पोहोचला पाहिजे, पण दक्षिण भारतासोबत केंद्र सरकारकडून चुकीचा व्यवहार केला जात असल्याचा आरोप डीके सुरेश यांनी केला आहे.

Lok Sabha 2024 : रोहित पवारांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीला खिंडार; शिंदेंनी मोठा शिलेदार फोडला

तसेच आमच्याकडून करातून गोळा होणारा पैसा उत्तर भारतातल्या राज्यांकडे वळविला जात आहे. सर्वबाजूंनी दक्षिण भारतावर अन्याय केला जात असून असा दुजाभाव करणे योग्य नसल्याचं डीके सुरेश म्हणाले आहेत. जर असा दुजाभव होत असेल तर दक्षिण भारतातील लोकांनी वेगळ्या राष्ट्राची मागणी पुढे केली पाहीजे. आम्हाला आमच्या वाट्याचा निधी मिळालाच पाहीजे. हिंदी पट्ट्यातून नेहमीच दक्षिणेतील राज्यांना सापत्न वागणूक दिली जाते. निधीचे असमान वाटप करणे, हा पूर्वीपासून अन्याय चालत आला असल्याची टीका त्यांनी केली आहे.

यावेळी बोलताना डीके सुरेश यांनी अर्थसंकल्पावर बोट ठेवत टीका केली आहे. हाह निवडणुकांचा अर्थसंकल्प असून बाकी काहीच नसून अंतरिम अर्थसंकल्पाच्या नावाखाली अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे. डीके सुरेश यांच्या विधानानंतर भाजपकडूनही त्यांना सडेतोडपणे उत्तर देण्यात आलं आहे. काँग्रेस खासदाराने देशाचे तुकडे करण्याची भाषा वापरली असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी कडाडून टीका केली. “एकेकाळी काँग्रेस पक्षात सरदार पटेल यांच्यासारखे मोठे नेते होते. ज्यांनी भारत अखंडीत राहण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, आज राहुल काँग्रेसमध्ये डीके सुरेश सारखे नेते आहेत. ज्यांना ध्रुवीकरणाचे राजकारण करायचे असून देशाला उत्तर आणि दक्षिण असे विभागायचे असल्याची टीका राजीव चंदशेखर यांनी केलीयं.

follow us

वेब स्टोरीज