दिल्लीच्या सीएमची खुर्ची वादाच्या भोवऱ्यात! रेखा गुप्तांच्या त्या खुर्चीच्या किंमतीवरून चर्चांना उधाण

Delhi CM's chair रेखा गुप्ता या सध्या त्यांच्या कार्यालयातील एका खुर्चीमुळे सोशल मिडिया आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत.

Delhi CM's chair

Delhi CM's chair

Delhi CM’s chair in a controversy! Rekha Gupta’s chair sparks debate over its price : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता या सध्या त्यांच्या कार्यालयातील एका खुर्चीमुळे सोशल मिडिया आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत. एक्सवर त्यांनी पोस्ट केलेले खुर्चीचे फोटो आणि तिच्या खासियतीवरून त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यामध्ये त्या अत्यंत आलिशान ऑफिस खुर्चीवर बसलेल्या दिसत आहेत. सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांकडून वापरली जाणारी ही प्रीमियम एक्झिक्युटिव्ह खुर्ची अत्यंत महागडी असून तिची बाजारातील अंदाजे किंमत ६६ हजार ते ८२ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. या खुलाश्यानंतर दिल्लीच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला असून विरोधी पक्ष आणि सामान्य नागरिक यावर मीम्स शेअर करत तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.

मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या व्हायरल खुर्चीत नेमकं काय खास?

डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुरू असलेल्या दाव्यांनुसार ही खुर्ची प्रीमियम श्रेणीतील ‘रेड ओक इम्पेरियो’ लक्झरी एक्झिक्युटिव्ह चेअर असल्याचे सांगितले जात आहे. ही खुर्ची साधी नसून, कमालीचा कम्फर्ट आणि आराम देणारी आहे. ज्याची किंमत प्रचंड असते. खुर्चीच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक मल्टी-पॉइंट मसाज सिस्टीम, स्वयंचलित फुटरेस्ट (पाय ठेवण्याची सोय), खोलवर रिलाइन होण्याची क्षमता आणि विशेष ‘झिरो-ग्रॅव्हिटी’ मोड यांचा समावेश आहे. हा मोड दीर्घकाळ काम करताना पाठीच्या कण्यावरील आणि शरीरावरील ताण कमी करण्यास मदत करतो. याशिवाय, या खुर्चीत उच्च घनतेचे फोम कुशन आणि प्रीमियम दर्जाच्या अस्सल लेदर अपहोल्स्ट्रीचा वापर करण्यात आला आहे.

विरोधक आणि सोशल मीडियाकडून प्रश्नचिन्ह

या खुर्चीचे फोटो व्हायरल होताच हा मुद्दा दिल्ली सरकारच्या खर्चाभोवती केंद्रित झाला. सोशल मिडीया आणि विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला की, जनतेच्या कराच्या पैशांत चालणाऱ्या सरकारी कार्यालयात इतकी महागडी आणि आलिशान खुर्ची खरोखर आवश्यक होती का?टीकाकारांचे म्हणणे आहे की, हा प्रकार दिल्ली सरकारच्या साधेपणा आणि काटकसरीच्या सार्वजनिक दाव्यांच्या पूर्णपणे विरोधात आहे.

कृषीप्रधान देश म्हणतात अन् शेतकऱ्यांच्याच शेतमालाला भाव नाही… अण्णा हजारे

नेटिझन्सनी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या जुन्या छायाचित्रांचा आणि दौऱ्यांचा उल्लेख करत सांगितले की त्या पूर्वी साधी प्रतिमा दाखवण्यासाठी दिल्ली मेट्रो आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना दिसत होत्या. मात्र आता ही खुर्ची ‘दिखाव्याच्या राजकारणा’चे प्रतीक असल्याचं बोललं जात आहे.

मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रालयातील कार्यालयातून 80 हजार चोरीला..

उल्लेखनीय बाब म्हणजे रेखा गुप्ता या सध्या दिल्लीच्या नवव्या मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत आणि त्या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) तिकिटावर शालीमार बाग विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. 2025 च्या सुरुवातीच्या निवडणुकीत त्यांच्या नियुक्तीनंतर सुमारे
27 वर्षांनी भाजपने राष्ट्रीय राजधानीत पुन्हा सत्ता मिळवली होती. अशा परिस्थितीत, या खुर्चीच्या वादामुळे दिल्लीच्या राजकारणात सरकारी खर्चातील पारदर्शकता आणि जनतेतील नेत्यांच्या प्रतिमेबाबत नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

 

Exit mobile version