Youtuber Dhruv Rathee : भाजप नेते सुरेश नखुआ यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात दिल्ली न्यायालयाने युट्यूबर ध्रुव राठी याला समन्स बजावलं आहे. सुरेश नखुआ यांनी त्यांच्या याचिकेत आरोप केला आहे की, ध्रुव राठीने (Dhruv Rathee) त्याच्या व्हिडिओमध्ये त्यांना ‘हिंसक आणि अपमानास्पद ट्रोलर’ (YouTuber) म्हणत त्यांचा अपमान केला आहे.
या विषयावर बार आणि बेंच संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या साकेत न्यायालयाने राठीला २९ जुलै रोजी समन्स बजावलं आहे. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायाधीश गुंजन गुप्ता यांनी केली. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 6 ऑगस्ट रोजी होणार आहे. ध्रुव राठीने समन्स स्पीड पोस्ट, कुरिअर आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेही पाठवावेत, असे न्यायालयाने आपल्या निर्देशांमध्ये म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण? Dhruv Rathee च्या अडचणी वाढल्या, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या मुलीबाबत ते ट्विट नडले
ध्रुव राठीने 7 जुलै 2024 रोजी YouTube वर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओचं शीर्षक होतं, ‘My Final Reply to Godi Youtubers. नखुआ यांनी ध्रुव राठीच्या या व्हिडिओवर आक्षेप नोंदवला आणि ते म्हणाले की, ‘ध्रुव राठीने केलेल्या आरोपांमुळे त्यांना (नखुआ) लोकांच्या संतापाचा सामना करावा लागत आहे. तसंच, व्हिडिओमध्ये केलेले सर्व आरोप निराधार आहेत. हे आरोप दुर्भावनापूर्ण पद्धतीने करण्यात आले आहेत.
पूर्णपणे जाणार नाही नेपाळमध्ये सौर्या एअरलाईन्सच्या विमान कसं क्रॅश झालं; व्हिडिओ आला समोर
याचिकेत नखुआंच्या वकिलाने म्हटलं आहे की, यामुळे याचिकाकर्त्याच्या चारित्र्यावरच शंका निर्माण होत नाही तर समाजात त्याला मिळालेला आदरही कलंकित होतो. त्याचबरोबर ध्रुव राठीच्या व्हिडिओचे परिणाम दूरगामी होऊ शकतात. यामुळे लोकांचा नखुआ यांच्यावरील विश्वास कमी होऊ शकतो. खटला दाखल करताना, त्यांनी म्हटलं होतं की या व्हिडिओमुळे त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रांवर कधीही भरून न येणारा परिणाम झाला आहे. त्याचा प्रभाव कधीही पूर्णपणे जाणार नाही.