भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांना न्यायालयाचा धक्का! लैंगिक छळ प्रकरणात नव्याने चौकशीची मागणी फेटाळली

भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांना न्यायालयाचा धक्का! लैंगिक छळ प्रकरणात नव्याने चौकशीची मागणी फेटाळली

Brij Bhushan Sharan Singh : लोकसभा निवडणुकीपूर्वी कैसरगंजचे खासदार आणि भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांना मोठा झटका बसला आहे. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणी ब्रिजभूषण सिंग यांची याचिका दिल्ली न्यायालयाने फेटाळली आहे. (Sexual Harassment Case) तसंच, या प्रकणाचा पुढील तपास सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (female wrestlers) या प्रकरणात अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी प्रियंका राजपूत यांनी 7 मे रोजी आरोप निश्चित करण्यात येतील असं सांगितलं.

 

आता काय फासावर लटकू का? कुस्तीपटूंच्या विरोधानंतर ब्रिजभूषण सिंह यांचा संताप

ब्रिजभूषण सिंह यांनी याचिका दाखल केली होती

या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यात यावी, अशी याचिका ब्रिजभूषण यांनी 18 एप्रिल रोजी याचिका दाखल केली होती. दिल्ली पोलिसांनी 7 सप्टेंबर 2022 च्या घटनेची चौकशी करावी, ज्यामध्ये आपल्याला आरोपी करण्यात आलं आहे, असं म्हणणं या याचिकेतून मांडण्यात आलं होतं. तसंच, यामध्ये ज्या तारखांचा उल्लेख केला आहे त्यातील एका तारखेला आपण भारत नव्हतो असंही ब्रिजभूषण यांनी या याचिकेत मांडलं आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडत असलेले एपीपी अतुल श्रीवास्तव यांनी ही याचिका उशिरा दाखल करण्यात आली असल्याचं सांगितलं आहे.

 

खटला रेंगाळत राहावा यासाठी याचिका केली

ब्रिजभूषण यांच्या या याचिकेवर महिला कुस्तीपटूंच्या वकिलांनी न्यायालयात आक्षेप घेतला. या खटल्याला विलंब करण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. ब्रिजभूषण सिंग सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यांच्यासोबत WFI चे माजी सचिव विनोद तोमर देखील जामिनावर बाहेर आहेत. परंतु, यांना अटक होण्याची भीती आहे. त्यामुळे हा खटला असाच रेंगाळत राहावा यासाठी त्यांनी ही याचिका केली असा थेट आरोप कुस्तीपटूंच्या वकिलांनी केला आहे.

Wrestlers Protest : महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनावर केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी सोडलं मौन, म्हणाले…

 

हिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंग यांच्यावर आरोप केले होते

महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट हे पैलवानांच्या समर्थनार्थ धरणे धरत बसले होते. ब्रिजभूषण सिंग यांच्यावर सात कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे दोन गुन्हे दाखल केले होते. एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूने गुन्हा दाखल केला होता. पण नंतर तो मागं घेतला. तसंच, अन्य कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात कलम 354, 354ए आणि डी अंतर्गत 1 हजार पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube