तीन महिन्यांनंतरही कुस्तीपटूंना न्याय मिळेना, पुन्हा जंतरमंतरवर आंदोलन

तीन महिन्यांनंतरही कुस्तीपटूंना न्याय मिळेना, पुन्हा जंतरमंतरवर आंदोलन

Sexual harassment of female wrestlers भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) प्रमुख ब्रिजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांच्या विरोधात कुस्तीपटू पुन्हा जंतरमंतरवर आंदोलनाला बसले आहेत. 7 महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात लैंगिक छळाची (sexual harassment) तक्रार दिली आहे. तीन महिने झाले तरी देखील आम्हाला न्याय मिळाला नाही, असा आरोप आंदोलनाला बसलेल्या खेळाडूंनी केला आहे.

तीन महिने झाले, आम्हाला न्याय मिळाला नाही, म्हणून आम्ही पुन्हा आंदोलन करत आहोत. आम्ही न्याय मागतो, अद्याप एफआयआर दाखल झालेला नाही. आधी एफआयआर दाखल करा असे सांगितले होते, आता आम्ही एफआयआर दाखल करायाला गेलो तर पोलीस ऐकत नाहीत, असा आरोप खेळाडूंनी केला आहे.

आम्हाला रक्तपात नको होता, अन्यथा तेव्हाच…; अमृतपालच्या अटकेवर भगवंत मान स्पष्ट बोलले

कुस्तीपटू साक्षी मलिकने (Wrestler Sakshi Malik) सांगितले की, आम्ही दोन दिवसांपूर्वी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. परंतु अद्याप आमची सुनावणी झालेली नाही किंवा एफआयआरही नोंदवण्यात आलेला नाही. तक्रारदारांमध्ये एका अल्पवयीनासह सात महिला पैलवानांचा समावेश आहे. अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आम्ही पुन्हा धरणे धरण्याचा निर्णय घेतला आहे.

साक्षी म्हणाली की, समित्यांनी चौकशी अहवाल सादर केला आहे की नाही हे आम्हाला माहीत नाही. लोक आम्हाला खोटे म्हणू लागले. तपास अहवाल सार्वजनिक व्हायला हवा, मात्र त्याबाबत अद्याप काहीही माहिती नाही. मुलीचे प्रकरण किती संवेदनशील असते हे तुम्ही सगळेच समजू शकता.

पीएम मोदींना धमकी देणाऱ्याला बेड्या; सुरक्षेसाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात..

बजरंग पुनिया (Bajrang Punia) म्हणाले की, ब्रिजभूषण सिंग यांना अटक झाल्यावरच आमचा संप संपेल. आमचा संयम सुटला आहे. चौकशीसाठी दोन समित्या स्थापन करण्यात आल्या, मात्र काहीही निष्पन्न झाले नाही. आता या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायला हवी.

कुस्तीपटू विनेश फोगटने (Wrestler Vinesh Phogat) सांगितले की, देशातील सर्वोत्तम खेळाडूंनी हे आरोप केले आहेत. हे शोषण आम्ही सहन करत आहोत. तीन महिन्यांत ना समितीच्या एकाही सदस्याने आमचा फोन उचलला, ना मंत्रालयाने कोणाशी संपर्क साधला. पैलवानांनी पुरावे दिले नसल्याचे वारंवार बोलले जात आहे. ब्रिजभूषण यांच्याकडून त्यांच्या निर्दोषतेचा पुरावा एकदा तरी घ्या. आम्ही म्हणत आहोत की संपूर्ण प्रकरणाची नार्को टेस्ट झाली पाहिजे.

तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायला हवी. यानंतर दोषी कोण असेल. त्याला शिक्षा झाली पाहिजे. त्यात आमची चूक सिद्ध झाली तर आम्ही शिक्षाही स्वीकारू. आता जंतरमंतरवरच खाऊन झोपू. पण न्याय घेऊनच उठेल. आम्ही फक्त कुस्तीसाठी लढत आहोत. त्यासाठी आम्ही जीवही देऊ. मरतानाही जंतरमंतरवरच मरणार, असे विनेश फोगट म्हणाली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube