आम्हाला रक्तपात नको होता, अन्यथा तेव्हाच…; अमृतपालच्या अटकेवर भगवंत मान स्पष्ट बोलले

Untitled Design   2023 04 23T164818.475

Bhagwant Mann told the thrill of Amritpal’s arrest : गेल्या महिन्याभरापासून खलिस्तानवादी अमृतपाल सिंगचा (Amritpal Singh) पंजाब पोलिसांसह देशातील वेगवेगळ्या राज्यातील पोलिसांकडून शोध सुरू होता. मात्र, अमृतपालला पकडण्यात पोलिसांना यश येत नव्हतं. आधी पटिलाया, नंतर हरियाणा, अशी सतत आपली ठिकाणं बदलून अमृतपाल पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, अमृतपाल सिंग याला आज सकाळी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पंजाबच्या मोगा जिल्ह्यातून अमृतपालला अटक करण्यात आली. तो महिनाभराहून अधिक काळ फरार होता. अमृतपालच्या अटकेवर मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Man) यांनी पंजाब पोलिसांचे कौतुक केले आहे.

भगवंत मान म्हणाले की, 35 दिवस झाले. अमृतपाल सिंग यांना आज अटक करण्यात आली. राज्यातील शांतता, कायदा आणि सुव्यवस्था भंग करण्याचा काही लोक करत होते. आम्ही त्यांच्याविरोधात कारवाई केली आहे. राज्यात आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झाल्यापासून कायदा व सुव्यवस्था आणि लोकांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी सातत्याने काम केले जात आहे. आम्ही कोणत्याही निष्पाप व्यक्तीला त्रास देणार नाही. आम्ही सूडाचे राजकारण करत नाही, असं स्पष्ट केलं. आम्ही अमृतपालला 18 मार्चला देखील पकडू शकलो असतो, पण रक्तपात किंवा गोळीबार होऊ नये, अशी आमची इच्छा होती.

अमृतपाल सिंग यांच्या अटकेवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दावा केला की, मला काल रात्रीच या संपूर्ण माहिती मिळाली होती. त्यामुळं मी रात्रभर झोपू शकलो नाही. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये असे वाटत असल्याने मी दर 15-30 मिनिटांनी माहिती घेत होतो.

ते म्हणाले की, 18 मार्चपासून आम्ही अमृतपालचा शोध घेत होतो. पोलिसांनी ठरवलं असतं तर 18 मार्चला अमृतपाल अटक करता आली असती. पण, या दरम्यान, पोलिसांनी अत्यंत संयमाने काम केलं. आणि माहिती मिळताच कारवाई केली. राज्याच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले.

कुठलाही डेटा लीक होत असेल तर, MPSC प्रकरणावर आमदार रोहित पवार म्हणाले…

अमृतपालने गेल्या 35 दिवसांपासून फरार असतांना पंजाबमध्ये मात्र, शांतता कायम होती. पंजाबमधील लोकांनी काळे दिवस पाहिले असून आता तशी स्थिती नाही. आता पंजाब देशांचं नेतृत्व करेल, असं भगवंत मान म्हणाले.

तत्पूर्वी, आयजी सुखचैन सिंग गिल यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, रोडे गावात अमृतपालला पोलिसांनी चारही बाजूंनी घेरले होते. यातून त्याच्या सुटकेला वाव नव्हता. त्यानंतर 29 वर्षीय अमृतपाल याला सकाळी 6.45 वाजता अटक करण्यात आली. दहशतवादी जर्नेल सिंग भिंद्रनवाले हा रोडे गावातील असून अमृतपाल सिंगची गेल्या वर्षी याच गावात आयोजित कार्यक्रमात ‘वारीस पंजाब दे’ संघटनेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती.

गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतपालला अटक करण्यात आली आहे, त्याने आत्मसमर्पण केलं नाही. दरम्यान, आता अमृतपालला विशेष विमानाने आसामला पाठवण्यात आले. त्याला दिब्रुगड कारागृहात ठेवण्यात येणार आह त्यामुळं आता पंजाबमध्ये कोणतीही अनुचित घटना घडण्याची भीती नाही.

Tags

follow us