Coal and Liquor Scam प्रकरणी 100 हून अधिक एफआयआर, माजी मुख्यमंत्री बघेल यांचा भाजपवर हल्ला
Coal and Liquor Scam : छत्तीसगडमध्ये कोळसा आणि मद्य घोटाळ्याप्रकरणी (Coal and Liquor Scam) ईडीने मोठी कारवाई केली आहे. यामध्ये रायपूरच्या अँटी करप्शन ब्युरोने (Anti Corruption bureau ) शंभरहून अधिक लोकांवर एफआयआर दाखल केले आहेतय यामध्ये ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या केसेसमध्ये मद्य घोटाळ्याच्या केस मध्ये 35 आणि कोळसा घोटाळ्यामध्ये 71 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये माजी मंत्री, माजी आमदार, माजी मुख्य सचिव, दोन निलंबित आयएएस अधिकारी, निवृत्त आयएएस अधिकारी, यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे.
Donald Trump : लेखिकेचे लैंगिक शोषण प्रकरणी ट्रम्प यांची साक्ष, बायडन सरकारवर गंभीर आरोप
या कारवाई प्रकरणी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ईडी आणि आयकर विभाग गेल्या तीन वर्षांपासून या प्रकरणाची तपासणी करत आहे. मात्र यावर आत्ता कारवाई केली जाते. तसेच ईडी आयकर विभागाकडून तपास केला जात असताना, आमच्या कोणत्याही नेत्याचं नाव यामध्ये नव्हतं, मात्र एसीबीने आता आमच्या अनेक नेत्यांवरती गुन्हे दाखल केले आहेत, मला असं वाटतं की, आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे.
IND vs ENG : कसोटीवर भारताची पकड! केएल राहुल, जडेजासमोर इंग्लंडच्या गोलंदाजांची शरणागती
तसेच ते म्हणाले की, या प्रकरणांमध्ये काँग्रेस नेते यूडी मिंज यांचे नाव देखील घेण्यात आलं आहे. कारण त्यांनी सध्या मुख्यमंत्री असलेले विष्णू देव साय यांच्याविरुद्ध निवडणूक लढली होती. त्यामुळेच भाजपकडून ही पावलं उचलली जात आहेत. यातून भाजपची संकुचित आणि बदल्याची मानसिकता दिसते.
तर मिळालेल्या माहितीनुसार मद्य घोटाळ्यामध्ये अनवर ढेबर, माजी मंत्री कवासी लखमा, अनिल तुटेजा, त्यांचा मुलगा यश तुटेजा तसेच एक डझन हून अधिक महसूल अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर कोळसा घोटाळ्यामध्ये सध्या जेलमध्ये असलेले राणू साहू, समीर बिष्णोई, सोम्या चौरासिया, सुनील अग्रवाल, सूर्यकांत तिवारी, विनोद तिवारी, माजी मंत्री अमरजीत भगत, शिशुपाल सोरी, बृहस्पत सिंह, विवेक दाढ, भिलाईचे आमदार देवेंद्र यादव, माजी आमदार यूडी मिंज, माजी आमदार गुलाब कमरो, रामगोपाल अग्रवाल, विजय भाटिया, चंद्रदेव राय यांच्यासह 71 जणांवर आरोप लावण्यात आले आहेत.