दिल्ली मद्य घोटाळ्यात ‘CBI’ कडून ‘ईडी’च्या अधिकाऱ्याला बेड्या; काय आहे प्रकरण?

दिल्ली मद्य घोटाळ्यात ‘CBI’ कडून ‘ईडी’च्या अधिकाऱ्याला बेड्या; काय आहे प्रकरण?

Delhi Liquor Scam : राजधानी दिल्लीतील बहुचर्चित मद्य घोटाळ्यात (Delhi Liquor Scam) नवा ट्विस्ट आल आहे. या प्रकरणात काल ईडीच्या सहाय्यक संचालकासह अन्य सहा अधिकाऱ्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली. दिल्ली दारू घोटाळ्यातील एका आरोपीकडून पाच कोटी रुपये लाच घेतल्याचा आरोप या अटक केलेल्या अधिकाऱ्यांवर आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.

 

ईडीचे सहाय्यक संचालक पवन खत्री यांनी मद्यविक्रेते अमनदीप धल्ल यांच्याकडून पाच कोटी रुपये लाच घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात (Delhi Liquor Scam) सीबीआयने खत्री यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात खत्री यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हेगारी षडयंत्र, लोकसेवकाला लाच दिल्याबद्दलचा गुन्हा, भ्रष्ट किंवा बेकायदेशीर मार्गाने किंवा वैयक्तिक प्रभावाचा वापर करून सार्वजनिक सेवकावर प्रभाव पाडण्यासाठी अवाजवी फायदा देणे, लोकसेवकाच्या लाचेशी संबंधित एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याआधी शुक्रवारी या प्रकरणात (Delhi Liquor Scam) अटक केलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना राऊस अॅव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले होते.

Aditya-L1 Mission बद्दल ISRO ची मोठी घोषणा; ‘या’ दिवशी होणार लॉन्च

तपास यंत्रणांनी सिसोदिया यांची सर्व खाती जप्त केली आहेत. या प्रकरणाची (Delhi Liquor Scam) पुढील सुनावणी आता 22 सप्टेंबर रोजी होणार आहे. सिसोदिया यांनी वैद्यकिय आणि अन्य खर्चासाठी काही रक्कम बँक खात्यातून काढू देण्याची परवानगी मागितली होती. या प्रकरणात आता सीबीआयने आणखी मोठी कारवाई केली आहे. ईडीच्याच अधिकाऱ्याला अटक करण्यात आल्याने या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube