Aditya-L1 Mission बद्दल ISRO ची मोठी घोषणा; ‘या’ दिवशी होणार लॉन्च

Aditya-L1 Mission बद्दल ISRO ची मोठी घोषणा; ‘या’ दिवशी होणार लॉन्च

Aditya-L1 Mission : चांद्रयान-3 च्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) सूर्याचा अभ्यास करणार आहे. त्यासाठी एक मिशन सुरु केलं जाणार आहे. ही मोहीम येत्या 2 सप्टेंबरला सुरु केली जाणार आहे. आदित्य-L1 असं नाव देण्यात आलं आहे. आज इस्त्रोकडून ही माहिती देण्यात आली.

अंबाबाईच्या नावानं उदो! आता भक्तांना घेता येणार गाभाऱ्यातून दर्शन, पालकमंत्र्यांची घोषणा

इस्त्रोकडून सांगण्यात आले की, आदित्य-L1 चं लॉंचिंग श्रीहरीकोटा येथून भारतीय वेळेनुसार सकाळी 11.50 वाजता केले जाणार आहे. या मिशनचे प्रक्षेपण पाहण्यासाठी इस्त्रोकडून नागरिकांना आमंत्रित केले आहे.

श्रीहरिकोटा येथील लॉन्च व्ह्यू गॅलरीमध्ये त्याचे प्रक्षेपण पाहता येणार आहे. त्यासाठी नागरिकांना वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

मुकेश अंबानींनी घोषणा केलेले जिओ एअर फायबर नेमकं काय? किती पैसे मोजावे लागणार?

इस्त्रोकडून ट्वीटरवर याची लिंक देण्यात आली आहे. त्याच्या नोंदणीबद्दलची माहिती लवकरच दिली जाणार आहे. आदित्य-एल1 अंतराळयान सूर्याच्या बाहेरील थराचं निरीक्षण करणार आहे आणि सूर्य-पृथ्वी यांच्यामधील लँग्रेज पॉईंट (L1) वर सौर वाऱ्याच्या स्थितीचे निरीक्षण करण्यासाठी हे मिशन डिझाईन केले आहे. एल1 हे पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे.

आदित्य-L1 ही सूर्याचे निरीक्षण करणारी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची पहिलीच मोहीम आहे. आदित्य-L1 मोहिमेचे उद्दिष्ट L1 भोवतीच्या कक्षेतून सूर्याचा अभ्यास करण्याचे आहे.

आदित्य-L1 हे सात पेलोड्स घेऊन जाईल, जे वेगवेगळ्या वेव्ह बँडमध्ये फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सूर्याच्या सर्वात बाहेरील थराचे निरीक्षण करणार आहे. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार इस्त्रोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आदित्य-L1 मध्ये राष्ट्रीय संस्थांच्या सहभागासह संपूर्णपणे स्वदेशी प्रयत्न असणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube