दहावी-बारावीच्या परिक्षा कधी होणार? राज्य मंडळाकडून संभाव्य वेळापत्रक जाहीर…

दहावी-बारावीच्या परिक्षा कधी होणार? राज्य मंडळाकडून संभाव्य वेळापत्रक जाहीर…

दहावी-बारावीच्या परिक्षांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राज्य महामंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परिक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून त्यानूसार दहावी-बारावीच्या परिक्षा 21 फेब्रुवारी ते 22 मार्च दरम्यान होणार आहेत. राज्य मंंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रक जाहीर करुन माहिती दिली आहे.

Uttarakhand : …म्हणून ‘हे’ मंदीर वर्षातून एकदाच रक्षाबंधनच्या दिवशीच उघडते

राज्य मंडळाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानूसार बारावीची बोर्डाची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्चदरम्यान, तर तर दहावीची परीक्षा 1 ते 22 मार्चदरम्यान होणार आहे. काही दिवसांपूर्वीच दहावी आणि बारावीच्या परिक्षांबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Chandrayan – 3 उतरलेल्या भागाला ‘शिवशक्ती’ पॉईंट हे नाव का देण्यात आले?

यंदाच्या वर्षीपासून बोर्डाच्या परिक्षा दोन टप्प्यांत घेण्यात येणार असल्याचं शिक्षण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे दहावी बारावीमध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता वर्षातून दोनदा परिक्षा देण्यात येण्यात आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून निर्णय जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, राज्य मंडळाचा नियमानूसार दहावी बारावीच्या परिक्षा प्रचलित पद्धतीनेच होणार असून वेळापत्रक हे माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आलं आहे. मात्र, परिक्षेआधीच शाळा, महाविद्यालयांकडून छापिल वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येणार असून तेच वेळापत्रक अंतिम असणार आहे. तसेच प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी परिक्षांचं वेळापत्रक हे स्वतंत्र जाहीर करण्यात येणार असल्याचंही राज्य मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube