मुकेश अंबानींनी घोषणा केलेले जिओ एअर फायबर नेमकं काय? किती पैसे मोजावे लागणार?

मुकेश अंबानींनी घोषणा केलेले जिओ एअर फायबर नेमकं काय? किती पैसे मोजावे लागणार?

Jio Air Fiber : रिलायन्स जिओ (Reliance Jio) ही देशातील सर्वात मोठी कंपनी 5G नेटवर्क असणारी टेलिकॉम कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी सातत्याने नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असते. गेल्या अनेक दिवसांपासून जिओच्या (Jio) ग्राहकांना जिओ फायबरची प्रतिक्षा होती. आता युजर्संची जिओ एअर फायबरची (Jio Air Fiber) प्रतीक्षा आता संपली असून जिओ एअर फायबर गणेश चतुर्थीला म्हणजेच 19 सप्टेंबरला लॉन्च होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज याबाबतची घोषणा केली आहे. दरम्यान, एअर फायबर म्हणजे काय? Jio AirFiber ची किंमत किती असू शकते? याच विषयी जाणून घेऊ.

एअर फायबर म्हणजे नेमके काय?
डायरेक्ट एअर फायबर हे नवीन तंत्रज्ञान आहे. ज्यामध्ये ऑप्टिकल फायबरची गरज भासणार नाही. यात एक रिसीव्हर असेल, ज्यामध्ये 5G सिम असेल, ज्याला तुमचे वाय-फाय कनेक्ट केले जाईल. या स्थितीत, युजर्संनी 1Gbps पर्यंत वायरलेस हाय-स्पीड इंटरनेट सेवा मिळेल.

Jio AirFiber मध्ये काय खास ?
जिओ एअर फायबर ही एक प्रकारची वायरलेस इंटरनेट सेवा आहे. म्हणजेच तुमच्या घरात इंटरनेट कनेक्शनसाठी कोणतीही बाह्य वायर येणार नाही. Jio Air Fiber 5G नेटवर्क आणि अत्याधुनिक वायरलेस तंत्रज्ञान वापरून घरे आणि कार्यालयांना वायरलेस ब्रॉडबँड सेवा प्रदान करेल. जिओ एअरफायबर अल्ट्रा हाय स्पीड इंटरनेट कनेक्शन प्रदान करेल. त्याच्या मदतीने, आपण जलद इंटरनेटसह थेट सामग्री, क्लाउड गेमिंग, व्हिडिओ स्ट्रीमिंग, ऑनलाइन खरेदी सेवांमध्ये प्रवेश करू शकता. हे उपकरण कुठेही वापरले जाऊ शकते. हे डिव्हाइस एक प्रकारचे हॉटस्पॉट आहे जे अल्ट्रा-फास्ट 5G इंटरनेट गती प्रदान करेल. म्हणजेच हे Jio चे 5G हॉटस्पॉट आहे.

RIL AGM 2023: ईशा, आकाश आणि अनंत अंबानी यांची RIL बोर्डावर नियुक्ती… 

Jio AirFiber हे कॉम्पॅक्ट डिव्हाईस आहे आणि ते 1000 स्क्वेअर फूट क्षेत्रामध्ये वाय-फाय कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यास सक्षम असेल.

Jio Air Fiber ची ओळख करून देताना आकाश अंबानी म्हणाले की पारंपारिक ब्रॉडबँड वापरण्याची पध्दत पूर्णपणे बदलेल. थोडक्यात, जिओ एअर फायबरच्या आगमनामुळे दूरसंचार क्षेत्रात क्रांती होण्याची शक्यता आहे.

किंमत किती?
याची व्यावसायिक किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. लॉन्चपूर्वी याची घोषणा केली जाईल. मात्र, रिपोर्टनुसार, जिओ आपला एअरफायबर प्लॅन 20 टक्के कमी किमतीत लॉन्च करू शकते. त्यामुळं त्याची मासिक किंमत सुमारे 640 रुपये असू शकते. सहामाही योजना रु.3650 मध्ये लॉन्च केली जाऊ शकते. तसेच, Jio JioCinema सह अनेक अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देऊ शकते.

Jio दररोज 1.5 लाख नवीन ग्राहक जोडणार
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी म्हणाले, 10 दशलक्षाहून अधिक परिसर आमच्या ऑप्टिकल फायबर सेवेशी म्हणजे, जिओ फायबरशी जोडलेले आहेत. तरीही लाखो कॅम्पस आहेत जेथे वायर्ड कनेक्टिव्हिटी प्रदान करणे कठीण आहे. जिओ एअर फायबरमुळे ही समस्या कमी होणार आहे. या माध्यमातून 20 कोटी घरे आणि परिसरापर्यंत पोहोचण्याची आम्हाला आशा आहे. Jio Air Fibe लाँच केल्यामुळे, Jio दररोज 1.5 लाख नवीन ग्राहक जोडण्यास सक्षम असेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube