ज्या केरळ स्टोरीला खोटी कहाणी म्हटले तीच कहाणी मुलीच्या आयुष्यात ठरली खरी; केरमधील धक्कादायक घटना
आता स्वतः पी. व्ही. भास्करन यांच्या मुलीलाच त्या जाळ्यात अडकले आहेत, ज्या गोष्टीचा आरोप त्यांनी या चित्रपटावर केला होता.
जेव्हा २०२३ मध्ये ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा CPI(M) चे नेते पी. व्ही. भास्करन यांनी ती एक प्रचारकी फिल्म असल्याची टीका केली होती. त्यांनी दावा केला होता की या चित्रपटात दाखवलेले सर्व काही खोटं आहे आणि तो मुसलमानांविरोधात आहे. त्यांनी लोकांना विभागण्याचा प्रयत्न (Film) केला आणि आपल्या भागातील काही चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याचाही प्रयत्न केला होता. परंतु, आता यात दाखवलेल्या घटनांसारख त्यांच्या स्वत:च्याच मुलीसोबत घडलं आहे. त्यांच्या मुलीला जेरबंद केल्याचं समोर आलंय.
‘कांतारा’ची बॉक्स ऑफिसवर जादू ! दिवाळीत खेचली गर्दी, तब्बल 852 कोटींची कमाई
आता स्वतः पी. व्ही. भास्करन यांच्या मुलीलाच त्या जाळ्यात अडकले आहेत, ज्या गोष्टीचा आरोप त्यांनी या चित्रपटावर केला होता. पी. व्ही. भास्करन यांची मुलगी एका विवाहित मुस्लिम पुरुषाच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली आहे, ज्याला चार मुलं आहेत. आपल्या प्रियकरासोबत गेल्यानंतर रिया (बदललेले नाव) हिने आता एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे ज्यात तिने सांगितलं की तिला छळले जात आहे आणि मागील २० दिवसांपासून तिला बंद ठेवलं आहे. तिने हेही सांगितले की तो पुरुष तिच्याशी फक्त पैशासाठीच संबंधित आहे.
तिच्या वडिलांनी माध्यमांसमोर विनंती केली मी माझ्या मुलीला अशा व्यक्तीसोबत कसा पाठवू, ज्याला त्याच्या स्वतःच्या कुटुंबात किंवा समाजातही सन्मान मिळत नाही? या प्रकरणात कसारगोड एसपीकडे तक्रार अर्ज सादर करण्यात आला असून कारवाईची प्रतीक्षा आहे. ही घटना ‘द केरळ स्टोरी’ ने दाखवलेल्या त्या सत्यांबद्दल बरेच काही सांगते. हा त्या प्रभावाचाही नमुना आहे, जो या चित्रपटाच्या कथेमुळे समाजात निर्माण झाला आहे. हे खरोखरच दुःखद आणि दुर्दैवी आहे की ज्याने कधी म्हटले, होते की हा चित्रपट फक्त प्रचारावर आधारित आहे, त्यालाच आता त्या वास्तवाचा फटका बसला आहे.
पी.व्ही. भास्करन यांनी आरोप फेटाळून लावत म्हटलं आहे की ते जात किंवा धर्म काहीही असो, त्यांच्या मुलीच्या लग्नाचं समर्थन आहे. संगीताला एका अपघातात कंबरेखाली अर्धांगवायू झाल्याबद्दल भरपाई मिळाली होती आणि तिच्या वडिलांचा असा दावा आहे की, तीच्याशी लग्न केलेल्या पुरूषाचा खरा हेतू भरपाई हडप करणं होता. तो आधीच विवाहित आणि चार मुलांचा पिता असल्याचही ते म्हणाले आहेत.
