‘रील स्टार’ चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!’या’ दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार चित्रपट

Reel Star ' या बहुचर्चित आगामी मराठी चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

Letsupp (20)

The trailer of ‘Reel Star’ is out! The film will be released across Maharashtra on this day : दमदार संगीत प्रकाशन सोहळ्यानंतर ‘रील स्टार’ या बहुचर्चित आगामी मराठी चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. रायमा सेन, अवधूत गुप्ते, आकाश ठोसर, सायली पाटील, सोमनाथ अवघडे, गौरव मोरे, अनंत महादेवन, गुरू ठाकूर, आदर्श शिंदे इत्यादी हिंदी आणि मराठी सिनेविश्वातील दिग्गज कलाकारांनी ‘रीलस्टार’चा ट्रेलर शेअर केला आहे. ‘रील स्टार’मध्ये नेमके काय पाहायला मिळेल याची झलक ट्रेलरमध्ये आहे. मराठी चित्रपटाच्या कक्षा रुंदावणारा चित्रपट ‘रील स्टार’च्या रूपात पाहायला मिळणार असल्याचे संकेत ट्रेलर पाहिल्यावर मिळत आहेत. 14 नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; शवविच्छेदनाचा अहवाल आला, ‘त्या’ रात्री काय घडलं

‘जर एक सामान्य माणूस मनापासून सत्तेच्या बाजूने उभा राहिला ना, तर संपूर्ण सिस्टीम वठणीवर आणू शकतो’, असे म्हणत ‘रील स्टार’ या मराठी चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सायकलवरून फिरून सामान विकणाऱ्या भानुदास नावाच्या रस्त्यावरील एका विक्रेत्याची आणि त्याच्या कुटुंबाची कथा या चित्रपटात आहे. भानुदास जरी सायकलवरून सामान विकत असला तरी कमालीची रील बनवण्याची कला त्याच्या अंगी आहे. भानुदास आणि याच्या पत्नीची काही स्वप्ने आहेत. त्या स्वप्नांची गोष्ट ‘रील स्टार’मध्ये पाहायला मिळणार आहे. सत्ता, संघर्ष, जाती-पातीचे राजकारण आणि पैशांचा पॉवरगेमही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘पोलीसांच्या कर्तव्यनिष्ठेची जागा मनी आणि मसल पॉवर असलेले गब्बर घेतात, तेव्हा सामान्य माणसाला न्याय मिळत नाही’ हा संवाद खूप काही सांगणारा आहे. ‘तुम्ही आम्हाला मारून टाकू शकता, हरवू शकत नाही’, यांसारखे ट्रेलरमधील संवाद उत्सुकता वाढविणारे आहेत. ‘गर गर गरा, जिंदगी घुमे चाकावरती…’ हे गाणे कथानकाचा गाभा सांगणारे आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर जात वैधता प्रमाणपत्राबाबत मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय!

दिग्दर्शक सिम्मी आणि रॉबिन यांनी ‘रील स्टार’द्वारे वास्तवदर्शी कथानक प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. याबाबत ते म्हणाले की, या चित्रपटाची कथा आपल्या सर्वांच्या आजूबाजूलाच घडणारी आहे असे प्रेक्षकांना वाटेल. सर्वसामान्य माणसाच्या स्वप्नांची सांगड, संघर्ष आणि समाजव्यवस्थेतील राजकारणाशी घालून आम्ही एक मनोरंजक चित्रपट बनवला आहे. सुमधूर गीत-संगीत आणि दमदार अभिनय या चित्रपटाच्या सर्वात मोठ्या जमेच्या बाजू आहेत. दर्जेदार निर्मितीमूल्ये असलेला एक परीपूर्ण चित्रपट ‘रील स्टार’च्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळेल असेही त्यांनी सांगितले.

ब्रेकिंग : पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात मोठी अपडेट; गोखले बिल्डरनंतर ट्रस्टही घेणार माघार

जोस अब्राहम, मोनिका आणि निशील कंबाती यांनी जे-फाइव्हज एंटरटेनमेंट्स, फिनिक्स ग्रुप आणि इनिशिएटिव्ह फिल्म्सच्या बॅनरखाली ‘रीलस्टार’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. मल्टीस्टारर हिंदी-मराठी ‘अन्य’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सिम्मी आणि रॉबिन यांनी ‘रील स्टार’चे दिग्दर्शन केले आहे. सिम्मी आणि कृष्णा एंटरप्रायझेस हे चित्रपटाचे सह-निर्माते आहेत. नागराज मंजुळे यांचे सहायक दिग्दर्शक सुधीर कुलकुर्णी यांनी ‘रीलस्टार’चे लेखन केले आहे. या चित्रपटात वेगवेगळ्या मुड्समधील आणि वेगवेगळ्या प्रसंगाना अनुसरून एकूण पाच गाणी आहेत. ‘दृश्यम’ फेम संगीतकार विनू थॉमस यांनी या चित्रपटातील चार गीतांना संगीतसाज चढवला असून, एक गाणे संगीतकार शुभम भट यांनी संगीतबद्ध केले असून शुभम भट यांनी सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांचे सहायक म्हणून काम केले आहे.

राजकारण तापणार! फडणवीसांनी फासा टाकत दिले पवार अध्यक्ष असलेल्या VSI संस्थेच्या चौकशीचे आदेश

नागराज मंजुळे यांचे बंधू भूषण मंजुळे या चित्रपटात शीर्षक भूमिकेत असून, हाडाच्या पत्रकाराच्या दमदार व्यक्तिरेखेत प्रसाद ओक आहे. या दोघांच्या जोडीला मिलिंद शिंदे, कैलास वाघमारे, उर्मिला जे जगताप, रुचिरा जाधव, स्वप्नील राजशेखर, शुभांगी लाटकर, विजय पाटकर, अनंत महादेवन, ज्ञानेश वाडेकर, महेश सुभेदार, शिवाजी पाटणे, गणेश रेवडेकर, अभिनय पाटेकर, विशाल अर्जुन, राजेश मालवणकर, जगदीश हाडप, पुनम राणे, अभय शिंदे, अनिल कवठेकर, विनिता शिंदे, प्रशांत शिंदे, करीश्मा देसले आदी कलाकार आहेत. याशिवाय बालकलाकार अर्जुन गायकर आणि तनिष्का म्हाडसे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे क्रिएटिव्ह निर्माते महेंद्र पाटील आहेत आणि मुख्य सहयोगी दिग्दर्शक नंदू आचरेकर आहेत. दीपक पांडे या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर असून, रोहित कुलकर्णी असोसिएट डायरेक्टर आहेत. या चित्रपटातील व्यक्तिरेखांना भागवत सोनावणे यांनी रंगभूषा केली असून, राणी वानखडे यांनी वेशभूषा केली आहे. प्रोडक्शन डिझाईन राहुल शर्मा आणि समीर चिटणवीस यांनी केले असून निलेश रसाळ यांनी कला दिग्दर्शन केले आहे. सारेगामा अंतर्गत या चित्रपटातील गीते सादर करण्यात येत असून सिनेपोलीस या चित्रपटाचे वितरण करणार आहे.

follow us