राजकारण तापणार! फडणवीसांनी फासा टाकत दिले पवार अध्यक्ष असलेल्या VSI संस्थेच्या चौकशीचे आदेश

Vasantdada Sugar Institute च्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले यातून त्यांनी पवार काका-पुतण्यांना शह दिल्याची चर्चा सुरू आहे

Vasantdada Sugar Institute

Rohit Pawar Criticize to BJP, Amit Shah and Fadanvis for order inquiry of Vasantdada Sugar Institute : एकीकडे राज्यामध्ये महायुतीमध्ये सारकाही आलबेल नसल्याचं वारंवार समोर येत आहे. भाजप शिंदे आणि अजित पवार यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने वाद निर्माण होत आहे. त्यात अमित शाहंचं वक्तव्य अन् लगेचच फडणवीसांनी दिलेले वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश. या सगळ्या घटनाक्रमातून भाजप शिंदे- अजित पवारांना दूर लोटणार का? फडणवीसांनी पवार काका-पुतण्यांची कोंडी  केली आहे का? वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचं प्रकरण नेमकं काय? हे जाणून घेऊ सविस्तर…

नेमकं प्रकरण काय?

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही ऊस शेती आणि ऊस उत्पादनांवर संशोधन करणाऱ्या संस्था आहे. त्या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार असून संस्थेच्या नियम मंडळावर अजित पवार जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, जयप्रकाश दांडेगावकर हे नेते आहेत. दरम्यान राज्य सरकारच्या आदेशानुसार राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलातून एक रुपया या संस्थेला दिला जातो. त्याच बरोबर 2009 पासून ही संस्था विविध अनुदानांवर चालवले जाते. मात्र या संस्थेकडून सरकारच्या अनुदानाची रक्कम योग्य कारणासाठी वापरले जात नसल्याच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री चौकशी करण्याच्या आदेश दिले आहेत. यासाठी एक समिती देखील नेमण्यात आली आहे.

https://x.com/RRPSpeaks/status/1983014073525510233

Video : खडसेंच्या बंगल्यावर जबरी चोरी; रोख अन् सोनं लंपास, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

दरम्यान या चौकशीच्या आदेशानंतर राज्यातील राजकारणामध्ये चर्चांना उधान आले आहे. कारण केंद्रिय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले असताना त्यांनी राज्यात भाजपा कोणत्याही कुबड्यांचा आधारे नाही तर आपल्या मजबूत बहुमतावर चालत आहे. असं म्हणत एक प्रकारे शाहंनी शिंदे आणि अजित पवारांना इशारा दिला आहे. त्यानंतर लगेगचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार अध्यक्ष तर अजित पवार नियामक मंडळावर असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हा सगळा घटनाक्रम म्हणजे महायुतीतील मतभेद, शाहंचं मित्रपक्षांची गरज नसल्याचं विधान, यानंतर फडणवीसांनी पवार काका-पुतण्यांना चेक दिला आहे का? राज्यात नवं सत्ता समीकरण पाहायला मिळणार का? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती राहणार की नाही? या चर्चांना उधान आले आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

राज्यातील ऊस उत्पादनातील वाढीच्या माध्यमातून साखर उद्योगाला चालना देण्यात मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा (VSI) सर्वांत मोठा वाटा आहे. आदरणीय पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली अजितदादांसह सर्वपक्षीय नेते पक्षाच्या पलीकडं जाऊन केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थेवर काम करतात. तरीही या संस्थेच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश ही केवळ नियमित प्रक्रिया नाही तर भाजपाने ‘ठाण्यानंतर’ आपला मोर्चा आता ‘बारामतीकडं’ वळवल्याचा त्याचा अर्थ आहे.

‘लाडक्या बहिणी’ फडणवीस सरकारसाठी डोईजड?; वर्षभरात तिजोरीवर पडलेला ताण RTI मधून उघड

भाजपला कुबड्यांची गरज नाही हे कालच गृहमंत्री अमित शाह साहेबांनी स्पष्ट केलं आणि सोबतच VSI च्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. हा कुबड्यांवरील अवलंबित्व कमी करण्याचा तर प्रयत्न नाही ना! हे लवकरच स्पष्ट होईल. महत्त्वाचं म्हणजे जिथं आम्ही कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे देतो तिथं सरकार मौन बाळगतं, चौकशी करत नाही, पण राजकीय द्वेषातून एका चांगल्या संस्थेची चौकशी करून संस्थेचं नाव बदनाम केलं जातं, हे भाजपाचं आधुनिक राजकारण आहे. यातून कदाचित भाजपाचा राजकीय डाव साध्य होईल, पण राज्याचं मात्र नुकसान होतंय, त्याचं काय? असं म्हणत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशीचे आदेश देताच रोहित पवार भाजप, शाह आणि फडणवीसांवर कडाडले आहेत.

follow us