Video : खडसेंच्या बंगल्यावर जबरी चोरी; रोख अन् सोनं लंपास, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

Theft On Sharad Pawar NCP Leader Eknath Khadse राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांचा जळगाव शहरात शिवराम नगर भागात बंगला आहे.

  • Written By: Published:
खडसेंच्या बंगल्यावर जबरी चोरी; रोख अन् सोनं लंपास, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

Theft On Sharad Pawar NCP Leader Eknath Khadse : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंच्या जळगाव येथील बंगल्यावर चोरट्यांनी डल्ला मारल्याचे समोर आले आहे. सध्या दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने अनेक कुटुंबिय फिरायला जात आहे. खडसेदेखील दिवाळीनिमित्त बाहेरगावी असल्याने त्यांच्या जळगाव शहरातील शिवराम नगर भागात मध्यरात्री चोरट्यांनी चोरी (Theft) करून तब्बल 35000 रोख आणि सात ते आठ तोळे सोने लंपास केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे यामुळे जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

‘लाडक्या बहिणी’ फडणवीस सरकारसाठी डोईजड?; वर्षभरात तिजोरीवर पडलेला ताण RTI मधून उघड

मध्यरात्री चोरट्यांनी साधली संधी

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा जळगाव शहरात शिवराम नगर भागात बंगला आहे या ठिकाणी येतात खडसे वास्तव्यास  असतात. मात्र दिवाळीनिमित्त बंगल्यावरील वॉचमन दिवाळीनिमित्त गावाला गेला होता. हीच संधी साधत चोरट्यांनी मध्यरात्री मेन दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. सकाळी आजूबाजूच्या रहिवाशांच्या ही बाब लक्षात आली असता त्यांनी तात्काळ पोलिसांना फोनवरून घटनेची माहिती दिली.

रक्षा खडसेंच्या पंपावर पडला होता दरोडा

गेल्या महिन्यात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर रात्री अकरा वाजेच्या सुमारात दरोडा टाकण्यात आला होता. त्याठिकाणी देखील दरोडेखरांनी सामानाची तोडफोड करून एक लाख रुपये मुद्दल लंपास केली होती. या घटनेला एक महिना होत नाही तोच आज (दि.28) मध्यरात्री राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगाव शहरातील शिवराम नगर भागातील बंगल्यावर चोरट्यांनी डल्ला मारत 35000 रोख रक्कम आणि सात ते आठ तोळे सोने लंपास केले आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर ज्यावेळी दरोडा पडला त्यावेळी एकताचा कळसे यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला होता. त्यावेळी खडसेंनी सध्या जळगाव जिल्ह्यात हफ्तेखोरीमध्ये पोलीस मग्न असल्याचे म्हटले होते.

Video : अजित पवारांच्या राष्ट्रवादी घड्याळासमोरच ‘वाजले की बारा’ व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

काय काय चोरली गेले खडसेंनी सांगितले

माझ्या जळगाव शहरातील शिवम नगर भागात बंगला आहे त्या ठिकाणी दिवाळीनिमित्त जो वाशिम होता तो बाहेरगावी गेलेला आहे आणि त्या घराला सध्या कुलूप होते. मीदेखील बाहेरगावी असल्याने त्या ठिकाणी माझ्या लॉकरमध्ये साधारण  35 हजार रुपये रोख रक्कम होती. तसेच काही पाच पाच ग्रॅमच्या दोन अंगठ्या होत्या असे अंदाजे सात ते आठ डोळे सोने चोरीला गेल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी माध्यमांना दिली आहे.

follow us