ती माझी पोरगी, तुम्हाला पोलिसांत खेचणार, रक्षा खडसेंचा थेट आरोपीला कॉल, क्लिप व्हायरल..

Raksha Khadse Audio Clip : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुलीची छेड काढल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणी रक्षा खडसेंनी पोलीस (Jalgaon Police) ठाण्यात तक्रार केली. या छेडछाड प्रकरणावर आता राजकीय वर्तुळातूनही संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान, आता रक्षा खडसे आणि आरोपी पीयूष मोरे यांची एक ऑडिओ क्लिप समोर आली. यात रक्षा खडसे (Raksha Khadse) या चांगल्याच संतापलेल्या असल्याचं ऐकायला मिळतंय. मात्र, लेट्सअप मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.
Champions Trophy 2025 : वरुण चक्रवर्तीची दुबईत जादू ! गेलेला सामना भारताला जिंकून दिला
रक्षा खडसे यांची मुलगी काही मुलींसह मुक्ताईनगरला यात्रेत गेली असता तिची छेड काढण्यात आली. या प्रकरणी एकूण सहा आरोपींवर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. अशातच रक्षा खडसे यांनी पियुष नावाच्या कार्यकर्त्याला फोनवर म्हटलं की, तुमच्या जुन्या गावात त्या पोरांनी कृषिकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही त्याला सपोर्ट करताय? हे दोनदा घडलं ना? मी जर तिथं आले तर धिंगाणा करेन. ती माझी पोरगी आहे, अशा शब्दात खडसेंनी कार्यकर्त्यांना इशारा दिलाय.
एचएसआरपी नंबरप्लेटचे दर इतर राज्यांच्या तुलनेत समान, विरोधकांचा दावा खोटा; मुख्यमंत्री फडणवीस
पुढं त्या म्हणाल्या की, ती माझी मुलगी होती आणि तिच्या सुरक्षेसाठीच मी त्या पोलिसांना तिथं ठेवलंय. तुम्ही फक्त त्या आमदाराचे पाय चाटायला तिथं बसलेले आहात. ते आमदाराचेच लोक होतं ना? मी तुम्हा सर्वांना पोलिसांत खेचणार, तुम्ही आमदारांकडे जा किंवा शिंदे साहेबांकडे जा. त्या पोलिसाला बोलण्याचा तुझा काय अधिकार आहे? माझ्या लेकीच्या बाबत तू असं वागत असशील तर तुला सोडणार नाही. तुझ्यावर माझे उपकार आहेत, असंही रक्षा खडसे म्हणाल्या.
भरचौकात आणून फाशी द्या…
नवनीत राणा म्हणाल्या की, तुम्ही राजकारण कोणत्याही पातळीवर न्या. पण, असे प्रकार करू नका, माझी हात जोडून विनंती आहेत. राजकारण गेलं खड्ड्यात, जर कोणी राजकीय व्यक्ती असं करत असेल तर भरचौकात आणून त्यांना फाशी द्यावी, असं राणा म्हणाल्या.