Donald Trump : लेखिकेचे लैंगिक शोषण प्रकरणी ट्रम्प यांची साक्ष, बायडन सरकारवर गंभीर आरोप
Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump ) हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकरणांमुळे अडचणीत येत असतात. असेच एक प्रकरण म्हणजे लेखिका जीन कॅरोल (Jean carol ) यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.
IND vs ENG : कसोटीवर भारताची पकड! केएल राहुल, जडेजासमोर इंग्लंडच्या गोलंदाजांची शरणागती
नुकतच या प्रकरणी ट्रम्प यांची न्यू हॅम्पशायर कॉकस येथील न्यायालयात साक्ष पार पडली. यावेळी माध्यमांशी बोलताना टोनल ट्रम्प यांनी सध्या सत्तेत असलेल्या जो बायडन यांच्या सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, माझ्यावर सध्या सुरू असलेल्या प्रकरणामागे राजकारण आहे. यामागे डेमोक्रॅटिक पक्षाचा हात आहे. कारण त्यांना मला व्हाईट हाऊसमध्ये येण्यापासून रोखायचं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
लेखिका जीन कॅरल हिने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. कॅरोल यांनी या प्रकरणी न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टामध्ये धाव घेतली होती. यामध्ये त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून एक कोटी डॉलरची नुकसान भरपाईची मागणी केली होती. याच प्रकरणी गुरुवारी ट्रम्प यांची न्यायालयात साक्ष पार पडली. कॅरोल यांनी हा आरोप करताना म्हटलं होतं की, 1990 च्या दशकात ट्रम्प यांनी आपल्या सोबत मॅनहट्टनच्या बर्गडॉर्फ गुडमॅन डिपार्टमेंटल स्टोअर येथील ड्रेसिंग रूममध्ये लैंगिक शोषण केलं होतं.
‘इंडिया’ आघाडी सोबत राहिले तर नितीश कुमार PM…; अखिलेश यादव स्पष्टचं बोलले
दरम्यान डोनाल्ड ट्रम्पविरुद्ध सध्या सुरू असलेले हे काही एकच प्रकरण नाही. त्यांच्यावर सध्या अनेक प्रकरणं दाखल आहेत. यामध्ये 2020 च्या निवडणूक निकालांच्या वेळी एका नागरिकाकडून त्यांच्यावरती फसवणुकीच्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या व्यक्तीचा आरोप होता की, ट्रम्प यांनी निवडणुकांमध्ये सादर केलेल्या त्यांच्या संपत्तीच्या विवरणामध्ये त्यांनी कमी संपत्ती दाखवली. जेणेकरून बँकांकडून त्यांना लोन मिळेल.