‘इंडिया’ आघाडी सोबत राहिले तर नितीश कुमार PM…; अखिलेश यादव स्पष्टचं बोलले
Akhilesh Yadav : मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आता कोणत्याही क्षणी महागंठबधनची साथ सोडून पुन्हा भाजपासोबत (BJP) जाऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी झटका देत लालू प्रसाद यादव यांच्या राजदला सोबत घेत सरकार स्थापन केले होते. आता मात्र नितीश कुमार पुन्हा पलटी मारण्याच्या स्थितीत दिसत आहेत. इतकेच नाही तर सगळी तयारी झाली असून येत्या 28 जानेवारी रोजी त्यांचा भाजपाबरोबर शपथविधी होईल अशा चर्चा माध्यमांतून सुरू झाल्या आहेत. यावर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी प्रतिक्रिया दिली. नितीश कुमार इंडिया आघाडीत (India Alliance) राहिले असते तर ते पंतप्रधान होऊ शकले असते, असं विधान यादव यांनी केलं.
Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अंशतः यश : दहापैकी पाच मागण्या मान्य!
आज माध्यमांशी बोलतांना अखिलेश यादव म्हणाले की, नितीश कुमार इंडिया आघाडीत राहिले असते तर ते पंतप्रधान होऊ शकले असते. येथे पंतप्रधानपदासाठी कोणाच्याही नावाचा विचार केला जाऊ शकतो. नितीश कुमार यांना इंडिया आघाडीचे समन्वयक किंवा अन्य कोणतेही मोठे पद देता आले असते. काँग्रेस पक्षाने पुढाकार घ्यायला हवा. इंडिया आघाडीबाबत आणि नितीश कुमार यांच्याबाबत काँग्रेसने जी तत्परता दाखवायला हवी होती ती दाखवली नाही. त्यांच्याशी बोलायला हवे होते. नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीत राहावे, अशी माझी इच्छा आहे. कारण, नितीश कुमार यांनीच इंडिया आघाडी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला, असे अखिलेश यादव म्हणाले.
भावनिक कार्यकर्त्यांचा जेवणाचा आग्रह; स्वतःची ताकद सांगत जरांगेंनी केली मनधरणी
आगामी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये राहुल गांधींसोबत प्रचार करणार का, असा प्रश्न अखिलेश यादव यांना विचारण्यात आला. त्यावर बोललांना अखिलेश यादव म्हणाले की, याबाबत आत्ताच सांगणे कठीण आहे. त्यांच्यासोबत प्रचार करणार की नाही हे येणारा काळच सांगेल, असं ते म्हणाले.
अनेक राज्यात प्रादेशिक पक्ष मजुबूत आहेत. त्यामुळं लोकसभेच्या जागावाटपात प्रादेशिक पक्ष जास्त जागा मागत आहेत. मात्र, काँग्रेसकडून जास्त जागा काँग्रेसला कशा मिळतील, यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यामुळं घटक पक्ष नाराज असल्याची स्थिती आहे. यावर बोलतांना अखिलेश यादव म्हणाले की, मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही. जिथे प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत, तिथं त्यांना प्राधान्य दिले पाहिजे, असं यादव म्हणाले.
अलीकडेच अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यावरून विरोधकांनी हा सोहळा भाजपचा राजकीय प्रचाराचा कार्यक्रम असल्याची टीका केली होती. तर आता अखिलेश यादव यांनीही या मुद्यावरून सरकारवर टीका केली. भाजप राम मंदिरावरही राजकारण करत आहे. राम मंदिरचा भाजप
राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका त्यांनी केली.