भावनिक कार्यकर्त्यांचा जेवणाचा आग्रह; स्वतःची ताकद सांगत जरांगेंनी केली मनधरणी

  • Written By: Published:
भावनिक कार्यकर्त्यांचा जेवणाचा आग्रह; स्वतःची ताकद सांगत जरांगेंनी केली मनधरणी

नवी मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर धडकलेल्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) राज्य सरकारला सगेसोयऱ्यांबद्दलचा अध्यादेश काढण्यासाठी आज (दि. 26) रात्रीपर्यंतचा वेळ दिला आहे. तसेच आझाद मैदानावर जाण्याबाबतचा निर्णय उद्या (दि.27) दुपारी बारावाजेपर्तंय घेणार असल्याचे सांगितले. वाशीत बोलताना जरांगेंनी सरकारला वाढीव वेळ दिली आहे. यावेळी काही कार्यकर्त्यांनी जरांगेंना भावनिक साद घालत जेवणाचा आग्रह केला. मात्र, माझे उपोषण सकाळी अकरा वाजेपासूनच सुरू झाल्याचे जरांगेंनी सांगितले. (Maratha Protester Emotional Request To Manoj Jarang Patil)

आज वाशीतच मुक्काम, पण रात्री GR न काढल्यास उद्या आझाद मैदान गाठणार : जरांगेंकडून अखेरची डेडलाईन

जरांगेंचे दमदार भाषण झाल्यानंतर आणि सरकारला उद्यापर्यंतची डेडलाईन देऊ केल्यानंतर जरांगेंनी उपस्थित मराठा आंदोलकांना राहण्याची सोय करण्यात आलेल्या मैदानावर जाऊन जेवण करण्याची आणि आराम करण्याची विनंती केली. यावेळी तेथे उपस्थित काही मराठा आंदोलकांनी जरांगेंनादेखील जेवण करून घेण्याची तसेच उपोषण उद्यापासून सुरू करण्याची भावनिक विनंती केली. यावर माझे आमरण उपोषण सकाळी 11 वाजेपासून सुरू झाल्याचे जरांगेंनी सांगितले.

100 टक्के आरक्षण मिळेपर्यंत सरकारी नोकर भरती करु नका : जरांगेंची शिंदे सरकारकडे मोठी मागणी

जरांगेंच्या या उत्तरानंतरही अनेक कार्यकर्ते जरांगेंनी दोन घास खाऊन घ्यावे यासाठी आग्रही होते. मात्र, माझे शरीर एवढंही थकलेले नाही. त्यामुळे भावांनो दोन दिवसांच्या उपोषणाने मला काही होणार नसून, माझं शरीर पूर्णपणे साथ देत असून माय-बाप लेकरांचे कल्याण होईपर्यंत माझं शरीर थकतं नसल्याचा विश्वास जरांगेंनी जेवणाचा आग्रह करणाऱ्यांना दिला. जीव देईल पण आयुष्यात मराठ्यांचं नुकसान होऊ देणार नसल्याचेही यावेळी जरांगेंनी सांगितले.

Maratha Reservation Protest : वाशीत साऊंड सिस्टिमने लावला जरांगेंच्या आवाजाला ‘ब्रेक’

उपोषणाला किंवा गुलाल उधळायला आझाद मैदानात जाणारच

यावेळी जरांगेंनी राज्य सरकारने आजरात्रीपर्यंत आरक्षणा अध्यादेश काढला तरीदेखील आझाद मैदानावर जाणार असल्याचे जाहीर केले. आरक्षण दिले तर गुलाल उधळण्यासाठी आणि नाही दिले तर, उपोषणासाठी आझाद मैदानाकडे जाणारच असल्याचे जरांगेंनी स्पष्ट केले. आता सरकार जरांगेंनी केलेल्या मागण्या मान्य करत नव्याने अध्यदेश काढून आरक्षण देते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सरकारच्या अध्यदेशानंतर जरांगे आझाद मैदानावर गुलाल उधळण्यासाठी जातात की, उपोषणाला याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube