Donald Trump Video : ट्रम्प पुन्हा अडचणीत! महिलेच्या छातीवर दिला ऑटोग्राफ; ट्रम्प यांच्या कृतीवर नेटकऱ्यांचा आक्षेप
Donald Trump Signs Women Top : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात सापडतात. काही दिवसांपूर्वी एका लेखिनेके ट्रम्प यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यामुळं जगभर खळबळ उडाली होती. त्यानंतर ट्रम्प यांच्या आणखी एका कृतीमुळं मोठा वाद निर्माण झाला आहे. अमेरिकेतील आयोवा येथे ट्रम्प प्रचार करत असताना अचानक ते एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. त्यावेळी तेथील रेस्टॉरंटमधील महिलेच्या छातीवर ट्रम्प यांनी ऑटोग्राफ दिला. त्यामुळं ट्रम्प यांचे पाय अधिक खोलात जाण्याची शक्यता आहे.
पुढील वर्षी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला प्रचार सुरू केलाय. ट्रम्प यांनी अलीकडेच बेटेनडॉर्फ (आयोवा) येथील प्रचारावेळी कॅथीच्या ट्रीहाऊस पब-इटरी या ठिकाणी ट्रम्प यांना भेटण्यासाठी शेकडो लोक जमले होते. सध्या या ठिकाणचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ट्रम्प एका महिलेच्या छातीवर ऑटोग्राफ देताना दिसत आहेत. महिला वेट्रेसने ट्रम्प यांना ऑटोग्राफ मागितला, ट्रम्प यांनी तिला ऑटोग्राफ दिला, मात्र त्यांनी महिलेच्या छातीवर ऑटोग्राफ दिला. स्वत: त्या महिलेने त्यांना तसं करण्यास सांगितलं होतं. या २८ वर्षीय महिलेचे नाव अॅशले रशीद असून ती येथील बारटेंडर आहे. मात्र, नंतर त्यांनी महिलेच्या हातावर सहीही केली. त्याबद्दल महिलेने ट्रम्प यांचे आभार मानले.
https://x.com/MikeSington/status/1704819043843366916?s=20
मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या डोनाल्ड ट्रम्पच्या या व्हिडिओवर काही लोक आक्षेप घेत आहेत. ट्रम्प यांना त्यांच्या वर्तणुकीमुळं त्यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ट्रम्प यांनी महिलेच्या छातीवर ऑटोग्राफ देण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वी त्यांनी २०१५ मध्ये त्यांनी प्रचारादरम्यान महिलेच्या छातीवर ऑटोग्राफ दिला होता.
Sunil Tatkare : सुळेंच्या ‘त्या’ विधानावर सुनिल तटकरे बोलले; ‘दादांसारखा भाऊ..,’
एका ट्विटर युजरने लिहिले की हे सर्व करणे एखाद्या सुसंस्कृत नेत्याला शोभत नाही. दुसऱ्याने लिहिले, महिलांचा आदर करा. माजी राष्ट्रपती, तुम्हाला महिलांचा आदर कसा करायचा हे शिकण्याची गरज आहे. एकाने लिहिले की, जर एखाद्या महिलेने ऑटोग्राफ मागितला असेल तर तो देतोय, त्यात गैर काय?ट्रम्प आतापर्यंत या प्रकरणात अडचणीत
1. 2020 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव पलटवण्याचा कथित प्रयत्नांमुलं ड्रम्प यांच्यावर जॉर्जियामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला मात्र, ट्रम्प यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.
2. 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल उलथवून टाकल्याबद्दल ट्रम्प यांच्यावर एक वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यामध्ये कॅपिटल हिल हिंसाचाराच्या आरोपांचा देखील समावेश आहे.
3. याशिवाय, कागदपत्रांमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोपही ट्रम्प यांच्यावर आहे. याच प्रकरणात तपास यंत्रणेच्या कामात अडथळा आणल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
4. ट्रम्प यांच्यावर अमेरिकन अॅडल्ट फिल्म स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे दिल्याचाही आरोप आहे . त्यामुळं त्यांना या प्रकरणात 1 लाख 22 हजार डॉलर्सचा दंड देखील ठोठावण्यात आला.
ट्रम्पबद्दल अमेरिकन लोकांना काय वाटते?
अमेरिकेत होणाऱ्या निवडणुकांसाठी डोनाल्ड ट्रम्प देशाच्या कानाकोपऱ्यात प्रचार करत आहेत. क्विनिपियाक युनिव्हर्सिटीच्या सर्वेक्षणानुसार, 46 टक्के अमेरिकन लोकांना ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनवायचे आहेत. याव्यतिरिक्त, सर्वेक्षणाच्या एका प्रश्नात, देशाला राष्ट्रीय संकटातून बाहेर काढण्यासाठी कोण चांगले काम करेल, असं विचारण्यात आलं होतं. ज्यावर 51 टक्के मतदारांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला. तर 44 टक्के लोकांनी बिडेन यांना पाठिंबा दिला.