Wrestlers Protest : महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनावर केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी सोडलं मौन, म्हणाले…
महिला कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अखेर या प्रकरणार केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी मौन सोडलं आहे. आम्ही सर्व खेळाडूंच्या बाजूने असून चौकशीत कोणी दोषी आढळले तर कारवाई होणार असल्याचं मंत्री ठाकूर यांनी ठामपणे सांगितलं आहे.
सचिनच्या घराबाहेर काँग्रेसने लावले पोस्टर, ‘मूग गिळून गप्प का?’#WrestlersProtest #SachinTendulkar #SakshiMalik #BajrangPunia #Phogat_Vinesh https://t.co/H6ueHFhKE6
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) May 31, 2023
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, आंदोलनकर्त्या महिल कुस्तीपटूंनी दिल्ली पोलिसांच्या चौकंशीचा अहवाल येण्याची वाट पहावी, या प्रकरणाची चौकशी सुरु असताना महिला कुस्तीपटूंनी सर्वोच्च न्यायालय आणि मंत्रालयावर विश्वास ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
काश्मीरमध्ये भारतीय लष्कराची मोठी कारवाई, 10 किलो IED बॉम्बसह 3 दहशतवाद्यांना अटक
तसेच आम्ही या प्रकरणी खेळाडूंशी चर्चा करून एक समिती स्थापन केली होती. त्यांनी निष्पक्षपणे चौकशी केली. त्यांनी क्रीडा मंत्रालयाला त्यांचा अहवाल सादर केला. दिल्ली पोलिसांनी एफआयआर देखील दाखल केली.
Pushpa 2 Bus Accident: ‘पुष्पा 2’ सिनेमाच्या बसचा झाला अपघात; दोन कलाकार जखमी
प्रकरण सर्वोच्च न्यायालयात देखील पोहचले. त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जाण्यास सांगितले. कुस्तीपटूंच्या अडचणी खुल्यापणाने ऐकून घेण्यात आल्या आहेत. या प्रकरणात आम्ही कोणताही हलगर्जीपणा केला नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.
Delhi Murder Case : “बदमाश, कहाँ चली गई थी तेरी बदमाशगिरी…” साक्षीचे हेच शब्द साहिलला टोचले…
23 एप्रिलपासून देशातील अनेक कुस्तीपटू ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी यासाठी जंतरमंतरवर आंदोलन करत होते. एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूंसह सात महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या अटकेसाठी कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु आहे.
दरम्यान, या महिला खेळाडूंच्या आंदोलनामुळं संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. कुस्तीपटूंनी आपली पदकं गंगा नदीत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कुस्तीपटूंना सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे.