Delhi Election 2025 : राजधानी दिल्लीतील निवडणूक यंदा चुरशीची (Delhi Elections 2025) होणार आहे. विशेष म्हणजे यंदा प्रमुख राजकीय पक्षांची लाट निवडणुकीतून गायब आहे. उमेदवारांना अधिक प्रभावी प्रचार करण्याच्या सूचना राजकीय पक्षांकडून दिल्या जात आहेत. यातच या पक्षांच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. काँग्रेस आणि भाजपच नाही तर सत्ताधारी आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री अतिशी, मनीष सिसोदिया यांनाही ही निवडणूक सोपी राहिलेली नाही. या मुख्य नेत्यांना फक्त भाजपच नाही तर काँग्रेसने देखील (Congress Party) चांगलेच घेरले आहे.
आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, मुख्यमंत्री अतिशी, कॅबिनेट मंत्री गोपाल राय, विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता, भाजपाचे माजी खासदार प्रवेश वर्मा, रमेश बिधुडी, अरविंद सिंह लवली, काँग्रेस नेते संदीप दीक्षित, अलका लांबा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव हे दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
यंदा नवी दिल्ली मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत होणार आहे. मागील दोन निवडणुकीत केजरीवाल (Arvind Kejriwal) सहज जिंकले परंतु यावेळी तशी परिस्थिती नाही. कारण भाजपने माजी खासदार प्रवेश वर्मा यांना तर काँग्रेसने माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांना (Sandip Dixit) रिंगणात उतरवले आहे. या दोन्ही पक्षांनी तगडे उमेदवार देत केजरीवाल यांना पुरते घेरले आहे. या मतदारसंघात (New Delhi) केंद्रीय कर्मचारी आणि झोपडपट्टी, वस्त्यांवर राहणाऱ्या मतदारांची संख्या जास्त आहे.
मणिपुरात भाजपला धक्का! नितीश कुमार यांच्या जेडीयूने पाठिंबा काढला; विरोधात राहणार
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुडन्युज देत आठवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली. यानंतर वातावरण आपल्या बाजूने होईल असा विश्वास भाजप नेत्यांना वाटू लागला आहे. दुसरीकडे झोपडपट्टीमधील मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. या मतदारसंघातून अरविंद केजरीवाल 2013, 2015 आणि 2020 मध्ये मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. या मतदारसंघात काँग्रेसने थोडी जरी मते स्वतःकडे खेचली तरी केजरीवाल यांना घाम फुटणार आहे.
आपचे मोठे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्यासाठीही निवडणूक टफ आहे. सिसोदिया यंदा पटपडगंजमधून निवडणूक लढत नाहीत. या ठिकाणी सिसोदिया तीनदा निवडून आले आहेत. तरीसुद्धा यंदा त्यांचा मतदारसंघ बदलला आहे . जंगपूरा मतदारसंघात भाजपने तरविंदर सिंह यांना संधी दिली आहे. दिल्ली दारू घोटाळ्यात सिसोदिया यांच्यावर आरोप आहेत. अनेक दिवस ते तुरुंगात होते. त्यामुळे यंदा मतदार त्यांना स्वीकारणार का याचा निर्णय निकालनंतर समजेल.
या मतदारसंघातून मुख्यमंत्री आतिशी दुसऱ्यांदा मैदानात आहेत. या मतदारसंघात भाजपने रमेश बिधूडी यांना तिकीट दिले आहे. काँग्रेसने सुद्धा महिला काँग्रेस अध्यक्षा अलका लांबा यांना संधी दिली आहे. येथील निवडणूक आता तिरंगी झाली आहे. तिन्ही उमेदवार जोरदार प्रचार करत आहेत. रमेश बिधुडी यांच्या टोकदार वक्तव्यांनी या निवडणुकीत रंगत आणली आहे. काँग्रेसनेही तुल्यबल उमेदवार दिला आहे. अशा प्रकारे आम आदमी पार्टीच्या नेत्यांची त्यांच्या मतदारसंघातच कोंडी केली आहे. या उमेदवारांनी त्यांच्याच मतदारसंघात अडकून पडावे अशी विरोधकांची रणनीती असू शकते असे झाले तर आम आदमी पार्टीच्या प्रचार अभियानावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
Delhi Assembly Elections 2025: मोठी बातमी! अरविंद केजरीवालांच्या गाडीवर दगडफेक
विजेंद्र गुप्ता (रोहिणी मतदारसंघ)
अरविंद सिंह लवली (गांधीनगर मतदारसंघ)
प्रवेश वर्मा (नवी दिल्ली मतदारसंघ)
रमेश बिधुडी (कालकाजी मतदारसंघ)
कैलाश गेहलोत (बिजवासन मतदारसंघ)
राजकुमार आनंद (पटेलनगर मतदारसंघ)