दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने ‘भारत पे’चे सहसंस्थापक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ‘भारत पे’ बद्दल अवमानकारक पोस्ट शेअर केल्याबद्दल हा दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे ग्रोव्हर यांनी माफी मागूनही न्यायालयाने कठोर पाऊल उचलले आहे, शिवाय यापुढे ‘भारत पे’बद्दल कोणतेही अवमानकारक विधान न करण्याची तंबीही दिली आहे.
काही महिन्यांपूर्वी 81 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपाखाली ‘भारत पे’ मधून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतरही अश्नीर ग्रोव्हर यांनी कंपनीविरोधात अनेक वेळा पोस्ट केली होती. या पार्श्वभूमीवर ‘भारत पे’ने ग्रोव्हर यांना कंपनीविरोधात पोस्ट करण्यापासून रोखावे अशी न्यायालयात याचिका दाखल केली होती. (Delhi High Court has imposed a fine of Rs 2 lakh on Ashneer Grover, co-founder and former managing director of ‘Bharat Pay)
यात अशनीर ग्रोव्हर यांनी पुन्हा असे होणार नाही, असे आश्वासन न्यायालयाला दिले होते. पण त्यानंतरही न्यायालयाने अत्यंत कठोर पाऊलं उचलतं 2 लाखांचा दंड ठोठवला आहे. शिवाय यापुढे ‘भारत पे’बद्दल कोणतेही अवमानकारक विधान न करण्याची तंबीही दिली आहे.
24 नोव्हेंबर रोजी, फिनटेक फर्म BharatPe ची मूळ कंपनी, Resilient Innovation ने दिल्ली उच्च न्यायालयात एक नवीन खटला दाखल केला. यात अश्नीर ग्रोव्हर यांनी कंपनीशी संबंधित गोपनीय माहिती उघड केली असल्याचे म्हटले होते. तसेच कंपनीच्या विरोधात पोस्ट शेअर न करण्याची मागणी केली होती.
अश्नीर ग्रोव्हर यांनी गेल्या आठवड्यात एक पोस्ट केली होती. यात टायगर ग्लोबलच्या नेतृत्वाखालील फंडिंग फेरीने आणि ड्रॅगनियर इन्व्हेस्टर ग्रुप आणि इतरांच्या सहभागाने $370 दशलक्ष जमा केले आणि परिणामी भारतपेचे मूल्य $2.86 अब्ज झाले. मात्र, त्यानंतर अश्नीर ग्रोव्हरने हे ट्विट काढून टाकले. कंपनीने आरोप केला की अश्नीर ग्रोव्हर यांची ही पोस्ट कंपनीबद्दल गोपनीय माहिती उघड करत आहे.
अश्नीर ग्रोव्हर एका कथित फसवणूक प्रकरणात चौकशीसाठी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसमोर (EOW) हजर झाले होते. EOW आठ मानवी संसाधने (HR) सल्लागार कंपन्या आणि ग्रोव्हर यांची पत्नी माधुरी जैन यांच्या नातेवाईकांमधील संबंध आणि पैशाच्या व्यवहारांची चौकशी करत आहे.