Online Payments : 2 हजारांपेक्षा अधिक रक्कम पाठवताना 4 तासांची प्रतिक्षा?
Online Payments : सध्या अनेक नागरिकांकडून ऑनलाईन व्यवहार(Online Payments) केले जात आहेत. ऑनलाईन व्यवहार करीत असताना अनेकदा फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत. सायबर गुन्हेगारांना(Cyber Crime) आळा घालण्यासाठी मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. आता दोन व्यक्ती पहिल्यांदाच ऑनलाईन व्यवहार करत असतील तर 4 तासांपर्यंत प्रतिक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. हा व्यवहार 2 हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचा असेल तरच 4 तासांची प्रतिक्षा करावी लागणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ऑनलाईन व्यवहार करण्यात अडचणी येणार आहेत.
ICC Champions Trophy : आधी ‘आशिया कप’ आता ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’; पाकिस्तानचं यजमानपद पुन्हा संकटात
तुम्ही एखाद्याला पहिल्यांदा पैसे पाठवत असाल तर तुम्हाला 2,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. दोन लोकांमधील पहिल्या व्यवहारासाठी सरकार चार तासांचा प्रतीक्षा कालावधी सेट करू शकणार आहे.
बँकिंग पेमेंटशी संबंधित हे बदल अंमलात आणल्यास, त्याचा प्रभाव फक्त युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) पुरता मर्यादित राहणार नाही. अहवालानुसार, प्रस्तावित बदल तात्काळ पेमेंट सेवा (IMPS) आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) सारख्या डिजिटल पेमेंट पद्धतींवर देखील लागू होतील. हे बदल सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी खूप मदत करू शकणार आहेत.
थायलंड, श्रीलंकेनंतर आता मलेशियाने भारतीयांना दिली व्हिसा फ्री एंट्री, जाणून घ्या कारण?
जर एखाद्या वापरकर्त्याने UPI वर खाते तयार केले तर तो पहिल्या 24 तासांत फक्त 5 हजार रुपये ट्रान्सफर करू शकतो. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) च्या बाबतीत, सक्रीय झाल्यानंतर 24 तासांच्या आत फक्त 50 हजार रुपये पाठवता येतात. तुम्ही त्यांना एकत्र किंवा तुकड्यांमध्ये पाठवू शकता.
आताच्या कुणबी नोंदी खडाखोडी करुन शोधल्या : छगन भुजबळांचा शिंदे समितीवर मोठा आरोप
नवीन योजनेनुसार, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीशी यापूर्वी कधीही व्यवहार केला नसेल, तर तुम्हाला 2,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवण्यासाठी चार तास प्रतिक्षा करावी लागणार आहे. पेमेंट रद्द करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी तुमच्याकडे चार तास असणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), सार्वजनिक आणि खाजगी बँका आणि Google सारख्या टेक कंपन्या या विषयावर आज बैठक घेणार आहेत.