सावधान! तुम्हालाही येऊ शकतो खंडणीसाठी फोन; ‘अकिरा’ व्हायरसपासून वाचण्यासाठी अशी घ्या काळजी

सावधान! तुम्हालाही येऊ शकतो खंडणीसाठी फोन; ‘अकिरा’ व्हायरसपासून वाचण्यासाठी अशी घ्या काळजी

Akira Virus : इंटरनेटवर अकिरा नावाचा एक नवा रॅन्समवेअर व्हायरस पसरला आहे. तो कम्प्युटर आणि लॅपटॉपमध्ये घुसून वैयक्तक माहिती चोरत आहे. तसेच चोरी झालेली माहिती परत करण्यासाठी या सायबर गुन्हेगारांकडून खंडणी मागण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय कम्प्युटर आपत्ती निवारण टीम म्हणजेच सीईआरटी-इन यांनी या व्हायरसपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. ( Take care computer from Akira Virus you may got ransom call)

राजकीय अर्थ काढू नका, तटकरेंच्या गळाभेटीवर जयंत पाटील बोलले…

सीईआरटी-इन या टीमने सांगितले की, विंडोज आणि लिनक्स या प्रणालीवर चलणाऱ्या कम्प्युटर्समध्ये याचा धोका सर्वाधिक आहे. जे लोक या व्हायरस ज्या लोकांच्या कम्प्युटरमध्ये घुसतो. त्यामध्ये तो युझर्सची माहिती कोडिंग करत आहे. त्यामुळे युझर्स स्वतःचीच माहिती पाहू शकत नाही किंवा वापरू शकत नाही. तर चोरी झालेली माहिती परत करण्यासाठी या सायबर गुन्हेगारांकडून खंडणी मागण्यात येत आहे.

नगरकरांची प्रतिक्षा अखेर संपणार; रेल्वेच्या दुहेरीकरणामुळे प्रवास होणार सुपरफास्ट

तसेच ही माहिती डर्क वेबवर सार्वजनिक करण्यात येत आहे. तर हे सायबर गुन्हेगार ही माहीती चोरण्यासाठी व्हर्चुअल प्रायवेट नेटवर्कचा (व्हिपीएन) वापर करत आहे. तर ही महिती चोरल्यानंतर हे लोक त्याला डॉट अकिरा हे एक्सटेंशन देत आहे. तर प्रोग्राम डेटा, रिसायकल बिन विंडो फोल्डर यातील फाईल्स चोरी केल्या जात नाही.

या व्हायरसपासून वाचण्यास काय काळजी घ्यावी?
– इंटरनेट वापरताना सावधान रहा.
-सुरक्षेच्या प्रोटोकॉल्सचं पालन करा.
-कम्प्युटरवरील डाटाचे ऑफलाईन बॅकअप ठेवा.
– कम्प्युटरवरील डाटा अपडेट केला जावा.
– जेणे करून जुन्या सिस्टिमद्वारे व्हायरस घुसण्याचा प्रयत्न करणार नाही.
– अनधिकृत माध्यमांद्वारे सिस्टीम आणि अॅप अपडेट करू नका.
-कोणतेही पासवर्ड मजबूत ठेवा.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube