नगरकरांची प्रतिक्षा अखेर संपणार; रेल्वेच्या दुहेरीकरणामुळे प्रवास होणार सुपरफास्ट

नगरकरांची प्रतिक्षा अखेर संपणार; रेल्वेच्या दुहेरीकरणामुळे प्रवास होणार सुपरफास्ट

Ahmednagar Railway News : नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पातंर्गत बेलापूर ते पढेगाव या 13 कि.मी. अंतराची यशस्वी चाचणी घेण्यात आली. लवकरच नगर ते मनमाड पर्यंतचे हे काम पूर्ण होणार असून, यामुळे नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे. या संपूर्ण मार्गात इलेक्ट्रीक इंजनचा वापर होत आहे.

गेल्या तीन वर्षापासुन नगर ते मनमाड द्रुतगती (डबललाईन) रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. या पूर्वी कोपरगाव ते येवला व येवला ते अंकाई, अंकाई ते अंकाई किल्ला, अंकाई किल्ला ते मनमाड, कोपरगाव ते कान्हेगाव, बेलापूर ते पुणतांबा या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. शनिवारी (दि.22 जुलै) 13 कि.मी. डबल लाईन रेल्वे मार्गाची चाचणी घेण्यात आली. आता एकूण 94 कि.मी. अंतराची चाचणी पूर्ण घेतल्याची माहिती उप मुख्य अभियंता (बांधकाम) दीपक कुमार यांनी दिली.

अमरावती : यशोमती ठाकूरांचा बालेकिल्ला खालसा; एका तपाच्या सत्तेला बच्चू कडूंनी लावला सुरुंग

मनमाड ते दौंड रेल्वे मार्गात नगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्त्वपूर्ण टप्पा येतो. मात्र हा मार्ग सिंगल लाईन असल्यामुळे रेल्वेगाडीचा वेग कमी होता. तसेच सिंगललाईनमुळे अनेकदा रेल्वेगाड्यांना थांबा घ्यावा लागत होता. तासनतास रेल्वे गाडी एकाच जागेवर थांबून ठेवावी लागत होती. मात्र आता हा संपूर्ण मार्ग इलेक्ट्रीक इंजीनचा वापर करून डबल लाईन करण्यात येत असल्यामुळे विनाकारण रेल्वेगाडयांचा थांबा आता बंद होणार आहे.

शरद पवारांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी? राष्ट्रवादीशी चर्चेनंतर थेट PM मोदींंनी दिली मोठी ऑफर

तसेच या कामामुळे रेल्वे ताशी 125 प्रति कि.मी. वेगाने धावणार असल्याने रेल्वेगाडी धावण्याचा वेगही सुपरफास्ट होणार आहे. तीन वर्षापासून हे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड व दुसऱ्या टप्प्यात नगर ते दौंड पर्यंत काम पूर्ण होणार आहे. नुकत्याच झालेल्या चाचणीत या द्रुतगती मार्गाचा नेमका वेग काढण्यात आला. नगर ते मनमाड पर्यतंचा टप्पा पूर्ण होण्यास अजुन एक वर्ष लागतील असा अंदाज आहे. यावेळी रेल्वे ताशी 125 वेगाने धावली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube