ऑनलाईन गुंतवणूक करताय? सावधान! सांगलीत टेलीग्रामवरून घातला लाखोंना गंडा

ऑनलाईन गुंतवणूक करताय? सावधान!  सांगलीत टेलीग्रामवरून घातला लाखोंना गंडा

Sangali Police : ऑनलाईन भेटलेल्या व्यक्तींसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवहार केल्याने अनेकांची फसवणूक झाल्याचे आपण पाहतो. असंच जास्त फायद्याचे आमिष दाखवून, एका टेलीग्राम ग्रुपच्या माध्यमातून, ऑनलाईन गुंतवणुकीतून फसवणूक झाल्याचा प्रकार सांगलीमध्ये उघडकीस आला आहे. सांगली पोलिसांनी तक्रारीनंतर याचा तपास सुरू केला आहे. ( Fraud by Telegram Group in Sangali Police Investigating )

मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यात कोल्डवॉर? काँग्रेसच्या आरोपांवर अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सांगलीमधील इस्लामपूरमध्ये राहणारे हर्षवर्धन पाटील यांनी पोलिसांमध्ये त्यांची 21 लाख 10 हजारांची फसवणूक झाल्याची तक्रार केली होती. यावेळी पाटील यांनी सांगितले की, त्यांच्याशी कॅपिटलिक्स ऑनलाईन टेलीग्राम ग्रुपवरून संवाद साधण्यात आला. त्यात त्यांना जास्त फायद्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करायला सांगितले. यासाठी एक बॅंक अकाऊंट नंबर देण्यात आला. तर परताव्यासाठी करापोटी आणखी पैसे जमा करायाला सांगितले. त्यासाठी आणखी एक बॅंक वेगळा अकाऊंट नंबर देण्यात आला.

Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर ‘बाजी’ कोण मारणार, सनी पाजी की खिलाडी? जाणून घ्या कलेक्श

दरम्यास सांगली पालिसांच्या तपासा दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली की, हे फसवणारे विविध बॅंकांचे 27 बनावट खाते वापरून ही फसवणूक करत होते. तर ज्यांच्या नावावर खाते आहेत. त्या सामान्या लोकांना हे माहित देखील नव्हते. तर अद्याप या प्रकरणाचा मुख्य टोली समोर आली नाही. तर या संशयास्पत 27 खात्यांवरील 7 कोटी 81 लाखांची रक्कम गोठवण्यात आली आहे.

दरम्या न सांगिली सायबर पोलिसांनी या कॅपिटलिक्स ऑनलाईन टेलीग्राम ग्रुपवरून किंवा अशा प्रकारच्या इतर कोणत्या टेलीग्राम ग्रुपवरून कोणाचीही फसवणूक झाली असल्यास त्यांनी तात्काळ सांगिली सायबर पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन सांगिली सायबर पोलिसांनी केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube