Global Report on Pollution : प्रदूषणाविषयी प्रकाशित करण्यात आलेल्या ताज्या रिपोर्टनुसार भारताची अवस्था फारकाही सुधारली आहे, असं नाही. जगातल्या २० सर्वात प्रदूषित शहरांपैकी १३ शहरं भारतातली आहेत. (Pollution) ज्यात आसामचं बर्निहट शीर्षस्थानी आहे. स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी आयक्युआरच्या जागतिक एअर क्वालिटी रिपोर्ट २०२४ नुसार दिल्ली जागतिक स्तरावर सगळ्यात प्रदूषित शहर ठरलं आहे. तर भारत हा जगातला पाचवा सर्वात प्रदूषित देश ठरला आहे. २०२३ मध्ये भारताचं स्थान तिसऱ्या क्रमांकावर होतं.
१० सर्वात जास्त भारतातलं शहरं
अहवालानुसार, २०२३ मध्ये ५४.४ मायक्रोग्राम प्रति घनमीटरच्या तुलनेमध्ये २०२४ मध्ये भारतात पीएम २.५ चे प्रमाण ७ टक्क्यांनी कमी होऊन सरासरी ५.६ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर होईल, असा अंदाज आहे. असं असलं तरी जगातील १० प्रदूषित शहरांपैकी सहा सर्वाधिक प्रदूषित शहरं भारतात आहेत.
Delhi Pollution : राजधानी दिल्लीत धुराचं साम्राज्य; वाहने, शाळांसह लाकूड जाळण्यावर बंदी
दिल्ली शहराच्या प्रदूषणाची स्तर सातत्याने उंचावत गेलेला आहे. वार्षिक सरासरीनुसार पीएम २.५ सांद्रता प्रति घटमीटर ९१.६ मायक्रोग्रॅम इतकी आहे. जी २०२३ मध्ये प्रति घनमीटर ९२.७ मायक्रोग्रॅम इतकी होती. जगातील सर्वात २० प्रदूषित शहरांमध्ये १३ भारतीय शहरं आहेत. यात बर्निहाट, दिल्ली, मुल्लानपूर, फरीदाबाद, लोणी, नवी दिल्ली, गुरगाव, गंगानगर, ग्रेटर नोएडा, भिवाडी, मुझफ्फरपूर, हनुमानगड आणि नोएडा या शहरांचा समावेश आहे.
भारतीयांच्या वयोमानामध्ये घट
भारतीय शहरांमध्ये ३५ टक्के वार्षिक पीएम २.५ पातळी ही डब्ल्यूएचओच्या ५ मायक्रोग्राम प्रति घनमीटर मर्यादेपेक्षा १० पट जास्त आढळून आली. भारतातील वायू प्रदूषणामुळे देशवासियांचं वयोमान ५.२ वर्षांनी घटलेला आहे. मागच्या वर्षी प्रकाशित झालेल्या लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ अभ्यासानुसार, २००९ ते २०१९ पर्यंत भारतामध्ये दरवर्षी सुमारे १५ लाख लोकांचे मृत्यू हे प्रदूषणामुळे झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे.