Mumbai : मुंबईकरांसाठी BMC चं खास प्लॅनिंग; परराज्यातील वाहनांना मुंबईत ‘नो एन्ट्री’

Mumbai : मुंबईकरांसाठी BMC चं खास प्लॅनिंग; परराज्यातील वाहनांना मुंबईत ‘नो एन्ट्री’

Mumbai : मुंबई (Mumbai) वाहतूक कोंडी आणि त्यातून निर्माण होणारं प्रदूषण हे एक समीकरणच आहे. मात्र आता यामधून मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण मुंबई महानगरपालिकेने दुसऱ्या राज्यातून मुंबईमध्ये येणाऱ्या वाहनांना चेक नाक्यांवरच थांबवण्याचे योजना केली आहे. त्यामुळे आता परराज्यातून मुंबईत येणारे अवजड वाहनं हे दहीसर आणि मानखुर्द याचे चेक नाक्यांवरच थांबणार आहेत.

विद्यापीठात अक्षता कलश पूजन करणं कुलसचिवांना भोवलं, पाटील यांची तडकाफडकी बदली

त्यासाठी या ठिकाणी पार्किंग आणि बस टर्मिनल बनवण्यात येतील. या प्रोजेक्टसाठी महानगरपालिकेला अडीचशे ते तीनशे कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. याबद्दल मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त कमिशनर अश्विनी जोशी यांनी माहिती दिली. लवकरच यासाठी टेंडर काढण्यात येणार आहे. तर या नाक्यांवर तब्बल 400 बस थांबण्याची व्यवस्था असेल.

GPay आणि Phonepe ला टक्कर देण्यासाठी येतेय TATA Pay अॅप, आरबीआयने दिली मंजुरी

यामध्ये दहिसर चेक नाक्यावर गुजरात, राजस्थान, दमन, दिव या राज्यातून येणाऱ्या अवजड वाहनं आणि बसला पार्क करण्याची व्यवस्था असेल. तर मानखुर्द चेक नाक्यावर गोवा, पुणे आणि राज्यातील इतर जिल्ह्यातून येणाऱ्या गाड्या पार्क केल्या जातील. तर या चेकनाक्यांवरून मुख्य शहरात येण्यासाठी लोकांना टॅक्सी कॅब बस आणि मेट्रो यासारख्या वाहनांची उपलब्धता असेल.

सुजय विखेंचं टेन्शन वाढलं! तनपुरे, लंके अन् शिंदेंही लोकसभेच्या रिंगणात…

हा एक पायलट प्रोजेक्ट असून त्याच्या यशानंतर शहरातील मुलुंड, ऐरोली आणि वाशी या भागात देखील अशाच प्रकारचे बस टर्मिनल आणि कमर्शियल हब बनवण्याची योजना आहे. मुंबईमध्ये वाढती वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी आगामी 50 वर्षांसाठीची ही योजना आहे. त्याचबरोबर या दोन्हीही चेक नाक्यावर ज्या ठिकाणी परराज्यातून आणि इतर जिल्ह्यातून येणारी अवजड वाहनात थांबणार आहेत. त्या ठिकाणी फूड प्लाझा, कमर्शियल सेंटर, शॉपिंग सेंटर देखील उपलब्ध असतील. या योजनेमुळे मुंबईमधील वाहतूक कोंडी, पार्किंग आणि वाढते प्रदूषण या समस्यांपासून मुंबईकरांना दिलासा मिळणार असल्याचा सांगण्यात येते.

दरम्यान मुंबईमध्ये दररोज तब्बल 44 लाखांहून अधिक वाहनं धावत असतात. त्यामुळे मुंबईकरांना ट्राफिक, पार्किंग आणि प्रदूषण या मुख्य समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र मुंबईमध्ये येणारे अशा प्रकारची कोणतीही ट्राफिक अधिकृत रित्या मुंबई महानगरपालिका रोखू शकत नाही. तरी देखील या चेक नाक्यांवरती हे अवजड वाहनांना, बसेस थांबवून ट्राफिक आणि इतर समस्या कमी होणारच आहेत. मात्र यामुळे नवीन रोजगाराच्या संधी देखील निर्माण होणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज