गुडन्यूज! पुणे-मुंबईचा प्रवास होणार आणखी फास्ट; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय

गुडन्यूज! पुणे-मुंबईचा प्रवास होणार आणखी फास्ट; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय

Pune News : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. वेगवान प्रवास व्हावा यासाठी हा महामार्ग तयार करण्यात आला होता. मात्र येथे ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा जास्त वाहने धावत असल्याने सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या अडचणींचा विचार करून या मार्गावर आता आणखी एक मार्गिका (लेन) तयार करण्याची चाचपणी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केली जात असून तसा प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे.

हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर महामार्गावरील दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी एक लेन वाढविण्याच्या कामास सुरुवात केली जाईल. या महामार्गाने नियमित प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कमी वेळात प्रवास होत असल्याने वाहनचालक याच मार्गाला प्राधान्य देतात. मात्र त्यामुळे येथे आता वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे.

विरोधी पक्ष नेत्याचा कोट अन् राज्याचा अर्थसंकल्प… : जयंत पाटलांनी सांगितला राणेंच्या दिलदारपणाचा किस्सा

या वाहतूक कोंडीतून मार्ग काढून मुंबई किंवा पुणे गाठणे अतिशय कंटाळवाणे आणि वेळखाऊ ठरत आहे. त्यामुळेच महामार्गावरील ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणखी एक लेन तयार करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.पुणे आणि मुंबई ही दोन्ही शहरे एकमेकांना जोडण्यासाठी सन 2002 मध्ये 94 किलोमीटर लांबीचा एक्सप्रेस वे तयार करण्यात आला. यामुळे दोन्ही शहरांतील अंतर कमी होऊन प्रवास अधिक गतीमान झाला. पुण्यातील आणि मुंबईतील नागरिक कमी वेळात शहरात येऊ लागले.

हायवे तयार करताना दिवसाला 40 हजार वाहने ये-जा करतील अशी क्षमता निश्चित करण्यात आली होती. मात्र नंतरच्या काळात या संख्येत वाढ झाली. आजमितीस या महामार्गावरून दररोज किमान 60 हजार वाहने ये-जा करतात. सुट्टीच्या दिवशी हा आकडा 80 हजारांपर्यंत पोहोचतो. इतक्या मोठ्या संख्येने वाहने येत असल्याने आता वाहतूक कोंडीचा त्रास जाणवू लागला आहे. ज्या उद्देशाने हा मार्ग तयार करण्यात आला होता तो साध्य होताना दिसत नाही.

त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी लेन वाढविण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube