सुजय विखेंचं टेन्शन वाढलं! तनपुरे, लंके अन् शिंदेंही लोकसभेच्या रिंगणात…

सुजय विखेंचं टेन्शन वाढलं! तनपुरे, लंके अन् शिंदेंही लोकसभेच्या रिंगणात…

Ahmednagar Loksabha : राज्यात आगामी काळात लोकसभा निवडणुका या होणार असल्याने आतापासूनच राजकीय हालचालींना वेग आलाय. यातच यंदा नगर दक्षिण लोकभसा (Ahmednagar Loksabha) निवडणुका चांगलीच गाजणार असे चित्र सध्या निर्माण झालंय. लोकसभेसाठी सुजय विखे (Sujay Vikhe) हे भाजपकडून उमेदवार असल्याच्या चर्चा सुरु आहे. तर सुजय विखे यांना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून देखील पाऊले उचलली जात आहे. एक प्रबळ उमेदवार देऊन ही निवडणुकीतील रंगत वाढणार असे दिसते आहे. मात्र आता हे सुरु असताना अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांची पत्नी राणी लंके यांनी आपण लोकसभा निवडणुका लढवणार असल्याचे जाहीरपणे बोलून दाखवले आहे. यामुळे या नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीमध्ये आता सुजय विखे यांची डोकेदुखी वाढणार असे दिसतंय.

दिवसेंदिवस किंग खानच्या ‘डंकी’ची बिकट परिस्थिती, 13व्या दिवशी निम्म्याहून कमी कमाई

लोकसभेच्या दृष्टीने विखेंची साखर पेरणी :
लोकसभा निवडणुका या येत्या काही महिन्यात जाहीर होतील. मात्र त्यापूर्वीच विद्यमान खासदार सुजय विखे यांनी राजकीय हालचाली सुरु केल्या आहेत. दिवाळीमध्ये उत्तरेमध्ये साखर वाटप केल्यांनतर त्यांनी आपला मतदारसंघ असलेल्या दक्षिण भागामध्ये साखर वाटप करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी दक्षिण भाग पिंजून काढला. ठिकठिकाणी सभा घेत साखर वाटप करत राजकीय भाषणातून कामांचा लेखाजोखा देखील जनतेपुढे मांडला. तसेच पक्षाने उमेदवारी दिल्यास पुन्हा मतांसाठी आपल्या दारी येईल असे साकडे देखील विखेंनी मतदारांना घातले. यामुळे लोकसभेच्या दृष्टीने विखे पूर्णपणे तयारीत असल्याचे दिसतेय.

तनपुरेही लोकसभेसाठी इच्छुक :
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून नगर जिल्ह्याची ओळख आहे. एकट्या नगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे सहा आमदार आहेत. मात्र, राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गट व अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. आजच्या स्थितीला शरद पवार यांच्याकडे 2 तर अजित पवार गटाकडे 4 असे आमदारांचं संख्याबळ आहे. पुन्हा एकदा जिल्ह्यावर आपली पकड निर्माण करण्यासाठी खुद्द शरद पवार आता जिल्ह्याच्या राजकारणात उतरले आहेत. नगर दक्षिणमधून विखेंना टक्कर देईल असा प्रबळ उमेदवार आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी स्पष्ट केले. तर पक्षाने आदेश दिले तर निवडणूक लढवू असे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असलेले प्राजक्त तनपुरे यांनी देखील बोलून दाखवलं आहे.

’60 वर्षांत नाही झालं ते CM शिंदेंच्या आदेशाने सुरु’; शंभूराज देसाईंची टोलेबाजी

आमदार लंकेची पत्नी लोकसभेच्या रिंगणात :
राष्ट्रवादीमधील फुटीनंतर आमदार निलेश लंके यांनी अजित पवार गटात जाणे पसंत केले आहे. लंके हे शरद पवार गटात सामील झाले तर त्यांना लोकसभेचे तिकीट देऊ, असे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले होते. मात्र, लंकेंनी यावर कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. दरम्यान, पारनेरमधील हांगामध्ये झालेल्या एका कार्य्रक्रमात खुद्द अजित पवार यांनी लंकेंना लोकसभेसाठी पाठबळ देखील जाहीर केले होते. तसेच पक्षाने सांगितले तर आपण निवडणूक लढवू, असेही लंके म्हणाले होते. मात्र, एकीकडे हे सगळं सुरु असताना आमदार लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी स्वतः आपण नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे जाहीरपणे बोलून दाखवले आहे.

शिंदेंची इच्छा अन् विखेंना पक्षांतर्गतच आव्हान :
भाजपचे विधानपरिषदेचे विद्यमान आमदार राम शिंदे व सुजय विखे हे एकाच पक्षात असले तरी दोघांमधील वाद हे काही लपून राहिलेले नाहीत. वेळोवेळी दोघांनी देखील एकमेकांवर टीका टिपण्णी करण्याची संधी सोडलेली नाही. शिंदेंनी विखेंचे विरोधक कोल्हे व निलेश लंके यांच्याशी जवळीक केलीयं. तसेच आपल्या भाषणांमधून बोलताना त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे देखील बोलून दाखवले. यामुळे आता विखे यांना खुद्द पक्षातूनच आव्हान मिळू लागले आहे. मात्र, भाजपकडून कोणाला संधी मिळणार? हे येत्या काळात स्पष्ट होईलच.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज