विद्यापीठात अक्षता कलश पूजन करणं कुलसचिवांना भोवलं, पाटील यांची तडकाफडकी बदली

विद्यापीठात अक्षता कलश पूजन करणं कुलसचिवांना भोवलं, पाटील यांची तडकाफडकी बदली

Nashik : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये (Yashwantrao Chavan Maharashtra Open University)अक्षता कलश पूजनावरुन (Kalash Pujan)झालेला वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. या कार्यक्रमाचे परिपत्रक काढणारे प्रभारी कुलसचिव भटूप्रसाद पाटील (In-charge Registrar Bhatuprasad Patil)यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. असं असलं तरीदेखील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. संजीव सोनवणे(Chancellor Prof. Sanjeev Sonwane) यांनी या घटनेचा त्यांच्या बदलीशी कसलाही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

सुजय विखेंचं टेन्शन वाढलं! तनपुरे, लंके अन् शिंदेंही लोकसभेच्या रिंगणात…

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आयोजित कार्यक्रमात विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे परिपत्रक काढण्यात आले होते. त्यावर विद्यापीठाच्या नियमांचं उल्लंघन करुन कार्यक्रमाचं आयोजन केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी आणि इतर काही संघटनांकडून जोरदार घोषणाबाजी करत विरोध करण्यात आला.

Rohit Pawar : ‘राजकीय गैरअर्थ काढू नका!’ गैरहजेरीच्या चर्चांवर रोहित पवारांचं ‘सोशल’ उत्तर

अभाविपने आयोजित केलेल्या कार्यक्रमाची माहिती कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला कुलसचिव भटूप्रसाद पाटील यांनी परिपत्रकाद्वारे देत सर्व शिक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याची सूचना केली होती. या कार्यक्रमाला अनेक संघटनांनी आक्षेप घेतला. त्या कार्यक्रमाला कुलगुरु प्रा.संजीव सोनवणे यांनी उपस्थित राहणं टाळलं.

या कार्यक्रमावरुन वाद निर्माण झाल्यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणं ऐच्छिक असल्याचं सांगत वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता कार्यक्रमाचे परिपत्रक काढणारे प्रभारी कुलसचिव भटूप्रसाद पाटील यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. ही बदली याच कारणामुळे केल्याची जोरदार चर्चा विद्यापीठात सुरु आहे.

विद्यापीठाचे कुलगुरु यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या बदलीचा त्या घटनेशी काहीही संबंध नसल्याचे कुलगुरुंनी सांगितले आहे. आगामी काही दिवसांमध्ये विद्यापीठाच्या परीक्षा सुरु होणार असल्याने कुलसचिव पदाच्या जबाबदारीतून भटूप्रसाद पाटील यांना मुक्त करण्याची मागणी त्यांनी यापूर्वीच केली होती.

त्यामुळे आगामी काही दिवसांसाठी भटूप्रसाद पाटील हे कुलसचिव पदाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार नव्हते. त्यामुळं प्रभारी कुलसचिव पदाची जबाबदारी विद्यार्थी सेवा विभागाचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे यावेळी कुलगुरु प्रा. सोनवणे यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube