Download App

महिला नगरसेवकांमध्ये जोरदार हाणामारी; AAP आणि भाजपा परस्परांत भिडले, कारण काय..?

दिल्ली : दिल्ली महापालिका (Municipal Corporation ) सभागृह गुरुवारी सकाळी सुरु झाल्यावर पुन्हा एकदा पाचव्यांदा स्थगित करण्यात आले आहे. पालिका (MCD) सभागृहात आम आदमी पार्टी (AAP) आणि भाजप (BJP) यांचे नगरसेवक आमने- सामने आल्याने दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. प्रचंड गोंधळामुळे कामकाज करणे अशक्य झाले. त्यातच आप आणि भाजपच्या महिला नगरसेविकांनी एकमेकींच्या अंगावर धावून जात जोरदार हाणामारी करण्यास सुरुवात केली. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिल्ली महापालिका सभागृह काल म्हणजेच बुधवार (22 फेब्रुवारी) पासून आज सलग दुसऱ्या दिवशी पाचव्यांदा स्थगित करण्यात आले आहे. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी वारंवार गोंधळ घातला जात आहे. कामकाजामध्ये सतत व्यत्यय आणला जात आहे. नगरसेवकांनी मतपेठ्या सभागृहातील खुल्या हौदामध्ये फेकल्या आहेत. काही नगरसेवक परस्परांमध्ये हाणामारी करताना आढळून आले. ज्याचा व्हिडिओ पाहायला मिळत आहे.

सभागृहात गुप्त मतदान पद्धती असताना नगरसेवक मोबाईलच्या माध्यमातून मतपत्रिकांचे फोटो काढत असल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यावरुन मोठा गदारोळ निर्माण झाला. स्थायी समिती सदस्यांच्या निवडणुकीच्या दरम्यान हा सर्व प्रकार घडला. हा सर्व प्रकार म्हणजे गुप्त मतदान पद्धतीचा भंग आहे. यामुळे पुन्हा एकदा नव्याने मतदान घ्यावे, अशी मागणी भाजपने केली.

IND W vs AUS W T20 : भारतासाठी आज ‘करो या मरो’ सामना

सभागृहाचे कामकाज तहकूब केले जात असताना, आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आणि ते म्हणाले, भाजप नगरसेवक स्थायी समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सर्व निवडणुका पहिल्या बैठकीत व्हाव्यात असे सांगितले होते. यामुळे पहिली बैढक आज आहे. परिणामी आम्हाला निवडणुका हव्या आहेत. आज म्हणजे आजच, मग ते रात्री असो किंवा सकाळी कधीही. ते पुढे म्हणाले, भाजपला जाणीवपूर्वक स्थायी समितीची संपूर्ण निवडणूक पुन्हा घ्यायची आहे. अशा प्रकारे ही प्रक्रिया कधीच संपणार नाही. एमसीडी सचिवांनी असेही म्हटले आहे की त्यांच्याकडे फक्त २४५ मतपत्रिका आहेत, आणि आम्ही संपूर्ण निवडणूक घेण्यास नकार दिला आहे. AAP वर प्रत्युत्तर देताना, भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी आपला अराजकतावादी आक्रमक पक्ष यावेळी म्हंटले आहे.

 

Tags

follow us