नवी दिल्ली : साहिल गेहलोतने चौकशीच्या दरम्यान पोलिसांना (Delhi Police) सांगितले की, त्याचे लग्न ठरल्याचे समजल्यावर निकीने त्याला सांगितले होते की आपण सोबत जगू शकत नाही… एकत्र मरू शकतो. (Delhi Murder Case ) यावरून ९ फेब्रुवारीच्या रात्री या प्रकरणावरून दोघांमध्ये बराच वेळ वादावादी झाली.
निक्की म्हणाली तुमच्याकडे तीन मार्ग आहेत. एक तर माझ्याशी लग्न कर नाहीतर घरच्यांनी नाते संबंध तोडून टाक, किंवा आपण दोघे एकत्र मरू. यावर साहिल म्हणाला की तो या तिघांपैकी काहीही करू शकत नाही. यावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. दरम्यान, साहिलने मोबाईल डेटा केबलने निकीचा गळा आवळून खून केला.
साहिलच्या ढाब्यात मिळायची दारू
मित्राव ते कायर गावाकडे जाताना दीड किलोमीटरचा भाग अगदी निर्जन आहे. पण लोकांची ये-जा या ठिकाणी फारच कमी होती. जिथे साहिलने त्याचा ‘खाओ-पियो’ ढाबा बनवला आहे, तिथे फार कमी लोक येतात आणि जातात. इतर दिवसांच्या तुलनेत शनिवार आणि रविवारी लोकांची जास्त वर्दळ असायची. लोकांचे म्हणणे आहे की, पूर्वी येथे एक गोठा होता, त्याला ढाब्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
घटनेची माहिती मिळताच लोक ढाब्याकडे वळले असता तेथे पोलिस पहारा असल्याचे त्यांना दिसले. ढाब्याच्या आत मोठ्या प्रमाणात बिअरच्या बाटल्या आणि ग्लास आढळून आले. येथील निर्जन भागाचा फायदा घेऊन काही मुले दारू पिण्यासाठी येत होते, असे तपासादरम्यान माहिती मिळाली, हा ढाबा दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहत होता.
साखरपुडा दिवशीच निकीचा काढला काटा
काही दिवसांपूर्वी निकीला समजले की साहिलचे १० फेब्रुवारीला लग्न होणार आहे, त्यामुळे तिला काळजी वाटू लागली. ती काही काळ एकटीच राहत होती आणि साहिल तिथे ये- जा करत असे. 9 फेब्रुवारीच्या संध्याकाळी, एंगेजमेंटच्या दिवशी, साहिल निक्कीला कारने घेऊन कश्मिर गेटला पोहोचला.
कारमधील मोबाईल फोनच्या डेटा केबलने साहिलने निकीचा गळा आवळून खून केला. साहिल मृतदेह घेऊन मित्राव गावात पोहोचला. त्याने ढाब्यात ठेवलेला फ्रीज रिकामा केला आणि त्यात निकीचा मृतदेह लपवला. त्यांनी ढाब्याला बाहेरून कुलूप लावून चावी सोबत ठेवली. तेथून तो त्याच्या घरी गेला आणि 10 फेब्रुवारी रोजी लग्न केले.