Download App

Delhi New CM : मोठी बातमी! रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री तर परवेश वर्मा उपमुख्यमंत्री

Delhi New CM : दिल्लीचे नवे मुख्यमंत्री होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर भाजप हायकमांड दिल्लीची कमान कोणाकडे देणार याकडे सर्वांचे

  • Written By: Last Updated:

Delhi New CM : रेखा गुप्ता (Rekha Gupta) दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री (Delhi New CM ) तर परवेश वर्मा (Parvesh Verma) उपमुख्यमंत्री होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर भाजप (BJP) हायकमांड दिल्लीची कमान कोणाकडे देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. काही वेळापूर्वी दिल्ली भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक दिल्ली भाजपच्या राज्य कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत दिल्ली निवडणुकीत नवनिर्वाचित आमदार उपस्थित होते. तसेच या बैठकीला निरीक्षक ओ.पी. धनखड आणि रविशंकर प्रसाद देखील भाजप कार्यालयात उपस्थित होते. या बैठकीत रेखा गुप्ता यांच्याकडे दिल्लीची कमान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भाजपने दिल्लीत 70 पैकी 48 जागा जिंकल्या आहे. दिल्लीत मुख्यमंत्र्यांसोबत सहा मंत्री शपथ घेऊ शकतात. तर दुसरीकडे रामलीला मैदानावर शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. रेखा गुप्ता 20 फेब्रवारी रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे.

मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सर्व भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते, उद्योगपती आणि मान्यवर सहभागी होऊ शकतात.

अंजलीताई GR काढण्याची प्रक्रिया समजून घ्या, अर्धवट बुद्धीचे प्रदर्शन करू नका, धनंजय मुंडेंचा टोला 

follow us