Download App

आमदारकीला दोनदा पराभूत, पण आता थेट CM पदापर्यंत मजल; कोण आहेत रेखा गुप्ता?

अखेर आज दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपने रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांच्या नावाची घोषणा केली. 20 फेब्रुवारीला त्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

  • Written By: Last Updated:

Who is Rekha Gupta? : दिल्लीमध्ये भाजपनं (BJP) आपच्या (AAP) गडाला सुरुंग लावत सत्ता मिळवली, तब्बल 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपची सत्ता आली. दिल्लीचे नवे मुख्यमंत्री (Delhi Chief Minister) कोण असणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर आज दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपने रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांच्या नावाची घोषणा केली. 20 फेब्रुवारीला त्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. दरम्यान, मुख्यमंत्रिपद पटकावणाऱ्या रेखा गुप्ता आहेत तरी कोण? याच विषयी जाणून घेऊ.

मराठी साहित्ययात्री संमेलनाचा दिमाखात शुभारंभ! ढोल-ताशांच्या गजरात दुमदुमले रेल्वेस्थानक 

रेखा गुप्ता यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक जिंकली आहे. त्या शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा दिल्ली विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र २०१५ आणि २०२० च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. २०१५ मध्ये त्यांचा आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी यांनी सुमारे ११,००० मतांनी पराभव केला होता. तर २०२० मध्येही त्यांचा सुमारे ३४०० मतांनी पराभव झाला. मात्र, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी विजयाचा गुलाल उधळला.

दरम्यान, यापूर्वी रेखा गु्प्ता दिल्ली भाजपच्या सरचिटणीस आणि भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा देखील राहिलेल्या आहेत.

पारनेर, नगरकरांचा प्रवास होणार सुखद! पुणे-शिरुर उड्डाणपुलाच्या कामास लवकरच सुरूवात… 

रेखा गुप्ता आहेत तरी कोण?
रेखा गुप्ता यांचा जन्म १९७४ मध्ये हरियाणातील जींद जिल्ह्यातील नंदगढ गावात झाला. त्यांचे वडील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी होते. त्यांचे कुटुंब १९७६ मध्ये दिल्लीला स्थलांतरीत झाले. त्यामुळं त्याचं प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतचे संपूर्ण शिक्षण त्यांनी दिल्लीतच पूर्ण केले. त्यांचे एलएलबी पर्यंत शिक्षण झाले आहे.

शालेय जीवनापासून भाजप आणि संघाकडे ओढ…
रेखा गुप्ता यांचा विद्यार्थीदशेपासूनच संघ आणि आरएसएसकडे ओढा होता. शालेय जीवनात असतांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी त्या जोडल्या गेल्या होत्या. पुढं १९९५-९६ मध्ये, त्यांनी दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाची निवडणूक लढली आणि अध्यक्षा बनल्या. तर २००३-०४ मध्ये भाजप युवा मोर्चाच्या कामाला सुरूवात केली. त्यानंतर, २००४ ते २००६ या काळात त्यानी भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव म्हणून काम पाहिले.

२००७ मध्ये उत्तर पीतमपुरामधून त्या पहिल्यांदा नगरसेविका झाल्या. २००७-०९ एमसीडीमध्ये महिला कल्याण आणि बाल विकास समितीचे दोन वर्षे अध्यक्ष राहिल्या. २००९ मध्ये भाजपने त्यांना महिला मोर्चाच्या सरचिटणीस बनवलं.

रेखा गुप्ता दक्षिण दिल्ली महानगरपालिकेच्या (SDMC) माजी महापौर राहिलेल्या आहेत. २०२२ मध्ये भाजपने त्यांना आपच्या शेली ओबेरॉय यांच्याविरुद्ध एमसीडीच्या महापौरपदाच्या उमेदवार म्हणून उभे केलं होतं.

2025 च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रेखा गु्प्ता यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत गुप्ता यांनी वंदना कुमारी यांचा जवळपास ३०,००० मतांनी पराभव करत थेट मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली.

दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री
आज दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. रेखा गुप्ता दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री असतील. रेखा गुप्ता यांच्या आधी भाजपच्या सुषमा स्वराज, काँग्रेसच्या शीला दीक्षित आणि आपच्या आतिशी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. त्यानंतर आता २७ वर्षांनी भाजप पुन्हा एकदा दिल्लीत सत्तेत आली. रेखा गुप्ता दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री असतील.

follow us