Download App

केजरीवालांचा भाजपला इशारा.. ‘सीबीआय’ला नको होती सिसोदियांची अटक; भाजपला चूक पडणार महागात

Delhi News : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या अटकेनंतर देशातील राजकारणाचा पारा चढला आहे. विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू ठेवला आहे. त्यात आता आम आदमी पार्टीचे (AAP) प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी भाजपने सीबीआयमार्फत घेराव घालून मनीष सिसोदिया यांना अटक केली आहे. पण ही त्यांची मोठी चूक ठरू शकते, असा इशारा केजरीवाल यांनी दिला.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की, सीबीआयचे बहुतांश अधिकारी मनीषच्या अटकेच्या बाजूने नव्हते. मात्र राजकीय नेत्यांच्या दबावापुढे ते काही करू शकले नाहीत. मनीष सिसोदिया यांना केवळ राजकीय कारणामुळे अटक करण्यात आल्याचे केजरीवाल म्हणाले. सीबीआयच्या (CBI) तपासात त्यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. सीएम केजरीवाल यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

हे वाचा : उद्धव ठाकरे -केजरीवाल भेट होताच आपला धक्का : मनीष सिसोदिया यांना अटक

ते म्हणाले की, ‘मला सांगण्यात आले आहे की सीबीआयचे बहुतेक अधिकारी मनीषच्या अटकेच्या विरोधात होते. ते सर्व त्यांचा खूप आदर करतात आणि त्यांच्या विरोधात कोणताही पुरावा नाही.पण त्यांना अटक करण्याचा राजकीय दबाव इतका मोठा होता की आपल्या राजकीय स्वामींची आज्ञा मानावी लागली. आम आदमी पार्टीला फोडण्यासाठी आणि कमकुवत करण्यासाठी भाजप (BJP) सर्व प्रकारचे डावपेच वापरत असल्याचे केजरीवाल म्हणाले.

तुमच्या पक्षात सगळेच संत महात्मे आहेत का ? ; संजय राऊतांचा भाजपला सवाल

अबकारी घोटाळ्यात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेविरोधात आप प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी देशव्यापी निषेध जाहीर केला आहे. पक्षाचे कार्यकर्ते दिल्लीतील भाजप कार्यालयाचा घेराव करणार असून तेथे धरणे धरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित जिल्हा मुख्यालयात निदर्शने करताना, राज्यांतील पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रपतींना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतील.

Tags

follow us