उद्धव ठाकरे -केजरीवाल भेट होताच ‘आप’ला धक्का : मनीष सिसोदिया यांना अटक

  • Written By: Published:
उद्धव ठाकरे -केजरीवाल भेट होताच ‘आप’ला धक्का : मनीष सिसोदिया यांना अटक

नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना आत्ता सीबीआयने अटक केली आहे. तत्पूर्वी मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी (Liquor Policy Scams) सीबीआयने (CBI) त्यांची चौकशी केली. या चौकशीसाठी ते सकाळी 11.10 वाजता दिल्लीतील सीबीआयच्या मुख्य कार्यलयात पोहोचले होते. आठ तासांच्या चौकशीनंतर मनीष सिसोदियांवर ही अटकेची कारवाई करण्यात आली. दरम्यान, सिसोदियांची सीबीआयकडून चौकशी सुरू असताना आपच्या अनेक नेत्यांनी सीबीआय मुख्यालयाबाहेर आंदोलन केलं. मात्र मुख्यालयाबाहेर कलम १४४ लागू झाल्याने जवळपास ५० नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

https://www.youtube.com/watch?v=7iDNg6drHRA

 

दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात सीबीआयने दाखल केलेल्या तक्रारीत मनीष सिसोदिया यांच्या नावाचा उल्लेख होता. त्यांचे नाव संशयित आरोपींच्या यादीत सर्वप्रथम असल्याने ते सीबीआयच्या रडारवर आले होते. सिसोदिया यांच्याशिवाय, 14 अन्य आरोपींची नावे तक्रारीत नमूद आहेत. सिसोदिया यांच्यावर अबकारी विभागाकडून जारी करण्यात येणाऱ्या मद्य परवान्यासाठी खासगी विक्रेत्यांना 144 कोटी 36 लाख रुपयांचा नफा मिळवून देण्याचा आरोप आहे. या प्रक्रिये दरम्यान इतक्या रकमेचे परवाना शुल्क माफ केले गेले, ज्यामुळे सरकारचे नुकसान झाल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. शिवाय, उत्पादन शुल्क धोरण जाहीर होण्याअगोदरच काही दारु उत्पादकांसाठी नियमावली ‘लीक’ करुन देण्यात आली, असा आरोपही त्यांच्यावर असून दारु उत्पादकांकडून शंभर कोटी रुपयांची लाच घेतल्याचा दावा ईडीने केला आहे.

Ajit Pawar : माजी मंत्र्यांला अंडरवर्ल्ड मार्फत संपविण्याची भाषा… तरीही ‘ईडी’ सरकार सुस्त!

दरम्यान, सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी जाण्यापूर्वी सिसोदिया राजघाटावर जाऊन महात्मा गांधीजींना नमन केले. यावेळी सिसोदिया यांनी स्वत:ला भगतसिंग यांचे अनुयायी असल्याचे सांगितलं. ते म्हणाले, भगत सिंग देशासाठी शहीद झाले होते, त्यामुळे खोट्या आरोपांसाठी तुरुंगात जाणे ही आमच्यासाठी छोटी गोष्ट आहे. सिसोदिया यांचे हे वक्तव्याचे पोस्टरही जारी करण्यात आले. दोन पानांच्या या पोस्टरवर सिसोदिया यांचा फोटोही छापण्यात आला होता. खोट्या गुन्ह्यांची आम्हाला भीती वाटत नाही. आम्हाला तुरुंगात जाण्याची भीती नाही. आम्ही भगत सिंग आणि बाबासाहेबांचे अनुयायी आहेात आणि आम्ही मृत्यूशी सामना करायलाच निघालोय असं या पोस्टरवर लिहिलं होतं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube