Delhi Rains : राजधानी नवी दिल्लीत शनिवारी रात्री मुसळधार (Delhi Rains) पाऊस झाला. या पावसात राजेंद्रनगर येथील आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरले. या घटनेत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू (Delhi Heavy Rains) झाला. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की शनिवार सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास विद्यार्थी अडकल्याची माहिती मिळाली होती. यानंतर तातडीने घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरू करण्यात आले. काही तासांनंतर दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह आढळून आले. या घटनेनंतर खळबळ उडाली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
दिल्ली अग्निशमन विभागाने सांगितले की काही वेळानंतर तिसरा मृतदेह आढळून आला. त्यामुळे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या तीन झाली आहे. डिसीपी हर्षवर्धन यांनी सांगितले, पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मदतकार्य अजूनही सुरुच आहे. तळघरात अजूनही सात फूट पाणी आहे. पाणी बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
Pune Rain: मुरलीधर मोहोळांचा चौकशीचा सूर; पाणी सोडताना सावध का केल नाही? चौकशी करणार
फायर ऑफिसर अतुल गर्ग यांनी सांगितले तळघरात पाणी भरल्याची माहिती आम्हाला सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास मिळाली होती. येथे काही विद्यार्थी अडकले असू शकतात. तळघर पाण्याने पूर्ण भरले गेले होते. पंपाच्या मदतीने पाणी काढण्यात आले. येथील परिस्थितीची तीव्रता पाहून एनडीआरएफ आणि अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी हजर होते.
#UPDATE | Delhi: The death toll in the Old Rajender Nagar incident rises to three after the rescue teams recovered a third body from the basement: Delhi Fire Department
— ANI (@ANI) July 27, 2024
स्वाती मालीवाल यांनी या दुर्दैवी घटनेवर दुःख व्यक्त केले. आम आदमी पार्टीच्या नेत्या आतिशी यांनीही शोक व्यक्त केला. दिल्लीत शनिवारी सायंकाळी मुसळधार पावसामुळे दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेसाठी जे कुणी जबाबदार असतील त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा आतिशी यांनी दिला. राज्याचे मुख्य सचिवांनी या प्रकरणाची चौकशी करून चोवीस तासांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याचे आतिशी यांनी सांगितले.
#WATCH | Old Rajender Nagar incident | Delhi: Fire Officer Atul Garg says, “… A total of 5 fire vehicles reached the sport after we received the information at around 7.15 pm… We pumped the water out and recovered the dead bodies of two girls. Around three children were… pic.twitter.com/p453wAD21L
— ANI (@ANI) July 27, 2024
मिळालेल्या माहितीनुसार अग्निशमन विभागाला सायंकाळी 7 वाजून 19 मिनिटांनी फोन आला होता. या घटनेनंतर एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल आहे. मदतकार्य वेगाने सुरू असून तळघरातून पाणी बाहेर काढण्याचे काम केले जात आहे. नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.