हळूहळू कार चालली अन् स्फोट झाला; दिल्लीतील स्फोट म्हणजे सुसाईड बॉम्बरच ?

Delhi Red Fort blast: Delhi Red Fort blast: तीन वाहनांना आग लागली. या स्फोटामध्ये आतापर्यंत दहाहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Delhi Bomb Blast

Delhi Bomb car Blast

Delhi Red Fort blast : सोमवारी सायंकाळ सात वाजण्याच्या सुमारास कार स्फोटाने (Delhi Red Fort blast) दिल्लीबरोबर देश हादरला. लाल किल्ल्याजवळून (Red Fort) पाचशे मीटरवर असलेल्या मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक बाहेर कारचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भंयकर होता की प्रचंड आवाज झाला. बिल्डिंगचा काचा फुटल्या. तीन वाहनांना आग लागली. या स्फोटामध्ये आतापर्यंत दहाहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर 24 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या स्फोटाबाबत वेगवेगळी माहितीसमोर येत असताना दिल्लीचे पोलिस आयुक्त सतीश गोलचा (Shri Satish Golchha) यांनी महत्त्वाची अपडेट दिलीय.


मोठी बातमी! दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात स्फोट, 9 जणांचा मृत्यू

सोमवारी संध्याकाळी 6.52 मिनिटाने मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एकजवळच्या कारमध्ये स्फोट झाला. ती कार आय ट्वेंटी होता. मेट्रो स्टेशनजवळील रस्त्याने ते वाहन संथगतीने जात होते. त्यात काही लोक होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला असल्याचे पोलिस आयुक्त सतीश गोलचा यांनी दिली. यावरून दिल्लीतील स्फोट हा सुसाइड बॉम्बरचा प्रकार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे हे दहशतवादी कृत्य असल्याचा संशय यंत्रणांना आहे. त्या अँगलने यंत्रणेकडून तपास सुरू करण्यात आला आहे. चालत्या वाहनामध्ये स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहे. त्यामुळे पोलिस आणि तपास यंत्रणाकडून आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा, एनएसजीचे पथक घटनास्थळी पाहणी करत आहे.

खड्डयामुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! पीडितांच्या कुटुंबियांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण संपूर्ण सहकार्य करणार


स्फोटात जखमी झालेल्या ऑटो चालकाला दावा

दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळील स्फोटात जखमी झालेला ऑटो चालक झीशान यानेही महत्त्वाची माहिती दिली. तो म्हणतो माझ्या समोरची कार सुमारे दोन फूट अंतरावर होती. ते वाहन संथगतीने जात होते. त्यात अचानक स्फोट झाला आहे. तो स्फोट खूप भयंकर होता. बॉम्ब स्फोटसारखाचा प्रकार होता. परंतु हा बॉम्बस्फोट होता का हे मी सांगू शकत नाही, असे झीशान याने म्हटले आहे.


सर्व शक्यतांचा तपास करणार

या स्फोटाप्रकरणी पोलिस व गुप्तचर यंत्रणेकडून माहिती घेत आहे. या सर्व शक्यतांचा तपास केला जाणार असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

स्फोट झालेली गाडी मोहम्मद नदीमच्या नावावर तपास यंत्रणा हरियाणाला

स्फोट झालेली कार गाडी मोहम्मद नदीम नावाच्या व्यक्तीच्या नावे नोंदललेली असल्याचे तपासात समोर आले आहे. स्फोट झालेल्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासून दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न चालू आहेत. तर हरियाणा येथे तपास यंत्रणा रवाना करण्यात आलीय.

काय शक्यता असतील?

संभाव्य दहशतवादी कदाचित अन्य गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवू इच्छित होते; मात्र तत्पूर्वीच सिग्नलपाशी वेग कमी झालेल्या गाडीत स्फोट घडला.

हा आत्मघातकी दशहतवादी हल्ला असू शकतो.

जम्मू-काश्मीरमध्ये जैश ए मोहम्मद संघटनेचा मोठा कट उघडकीस, स्फोटकांचा साठा जप्त

गेल्या दोन दिवसातील तपासानंतर गडबडलेल्या दहशतवाद्यांनी अपुऱ्या तयारीच्या आधारे स्फोट घडवून आणण्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे.

Exit mobile version