लाल किल्ला परिसरात स्फोट, ब्लास्टमध्ये कोणत्या गाडीचा वापर? पोलिसांनी लावला छडा

या स्फोटात जवळच असेली एक स्कूटी आणि ऑटो रिक्शा जळून खाक झाली आहे. या शिवाय बाजूलाच असलेले अनेक वाहनेही जळून बेचिराख झाली आहेत.

  • Written By: Published:
News Photo   2025 11 10T211127.880

दिल्लीच्या लालकिल्ल्यासमोर जोरदार स्फोट झाला आहे. (Delhi) एका कारमध्ये हा स्फोट झाल्यानंतर बाजूलाच असलेल्या दोन्ही कारनेही पेट घेतला. त्यासोबतच आजूबाजूच्या वाहनांनीही पेट घेतल्याने आगीचे लोळ उठले. स्फोटाचा आवाज आणि आगीचे लोळ यामुळे या परिसरात असलेल्या नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.

या स्फोटात एकूण 9 जण ठार झाले असून 24 जण जखमी झाले आहेत. ज्या कारमध्ये हा स्फोट झाला ती कार कोणती होती? याचा तपास पोलिसांनी लावला आहे. अवघ्या काही मिनिटातच पोलिसांनी या कारचा तपास केला आहे. दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट नंबर 1जवळ सायंकाळच्या सुमारास मोठा स्फोट झाला. प्राथमिक तपासानुसार एका इको व्हॅन (Eco Van)मध्ये हा स्फोट झाल्याचं दिसत आहे. इको व्हॅनमध्ये स्फोट झाल्याचं पोलिसांनी तात्काळ शोधून काढलं असलं तरी आता ही कार कुणाची आहे? याचा शोध घेतला जात आहे.

मोठी बातमी! दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात स्फोट, 9 जणांचा मृत्यू

या स्फोटात जवळच असेली एक स्कूटी आणि ऑटो रिक्शा जळून खाक झाली आहे. या शिवाय बाजूलाच असलेले अनेक वाहनेही जळून बेचिराख झाली आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचा आवाज अत्यंत मोठा होता. हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या इमारतीच्या काचा फुटल्या. काही लोकांच्या मते घटनास्थळी रक्ताचे सडे आणि आणि काचांचे तुकडे विखुरलेले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या कारमध्ये स्फोट झाला, ती कार अत्यंत हळूहळू मेट्रो स्टेशनजवळ येत होती. या कारमध्ये तीन प्रवासीही होते, अशी माहिती मिळत आहे. हा स्फोट अत्यंत भीषण होता. एका कारमध्ये स्फोट झाला, मात्र, या स्फोटाची झळ तीन ते चार वाहनांना बसली. तज्ज्ञांच्या मते, हा बॅटरी ब्लास्ट असता तर स्फोटाची तीव्रता मर्यादित असती. पण तसं झालं नाही. त्यामुळे आता या स्फोटाचा तपास इतर यंत्रणा करण्याची शक्यता आहे.

स्फोटानंतर येथील एलएनजेपी रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात असंख्य रुग्ण आले असून त्यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, स्फोट झालेला परिसर सील करण्यात आला आहे. दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला असून वाहनांचा कसून तपास केला जात आहे. तसेच संशयितांची झाडाझडती घेतली जात आहे.

follow us