Download App

Odisha Train Accident : बालासोर रेल्वे दुर्घटनेनंतर शवगृह बनलेल्या ‘त्या’ शाळांवर हातोडा

Odisha Train Accident : ओडिशातील भीषण रेल्वे अपघातामध्ये आतापर्यंत तब्बल 294 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामधील मृतदेह जवळच असणाऱ्या बहनगा शाळेत (Behnaga High School)ठेवण्यात आले होते. त्यानंतर शवगृह ठेवण्यात आलेल्या शाळेत जायला विद्यार्थी घाबरत होते. शाळा व्यवस्थापन समितीने राज्य सरकारकरडे शाळा पाडण्याची विनंती केली होती. या मागणीनंतर राज्य सरकराने बालासोर येथील बहनगा शाळेची इमारत पाडण्याचे काम सुरू केले आहे. (Demolition of Bahanaga school building begins after Odisha’s Balasore train accident)

2 जून रोजी झालेल्या रेल्वे दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्या प्रवाशांचे मृतदेह जवळच्या शाळेत ठेवण्यात आले होते. यानंतर शाळेच्या वर्गांमध्ये मृतदेहांचे ढीग लागले होते. अशा परिस्थितीत मृतदेहांची ओळख पटवणं अवघड झाले होते. काही काळासाठी ही शाळा शवगृहात बदलली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना या शाळेत जाण्याची भीती वाटत होती. या घटनेनंतर विद्यार्थी आणि पालकांनी शाळेच्या अवस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता शाळा व्यवस्थापन समितीने ही शाळेची इमारत पाडण्याची विनंती राज्य सरकारकडे केली होती.

काँग्रेसचा आरएसएसशी पंगा! विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांतील ‘तो’ धडा वगळणार?

बहनगा हायस्कूलच्या शिक्षकांनी सांगितले की बहनगा हायस्कूल इमारतीमध्ये रेल्वे दुर्घटनेतील प्रवाशांचे मृतदेह ठेवले होते. त्यामुळे मुलांमध्ये आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण होते. विद्यार्थ्यांनी शाळेत आम्ही जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती. काल जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली होती. ही सगळी अंधश्रद्धा आहे. ज्या खोल्यांमध्ये मृतदेह ठेवण्यात आले होते ते पाडून 4-5 महिन्यांत नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. तोपर्यंत तात्पुरती व्यवस्था करून मुलांना शिकवले जाईल, असे शिक्षकांनी सांगितले.

बालासोरचे जिल्हाधिकारी दत्तात्रय भाऊसाहेब शिंदे यांनी शाळा आणि जनशिक्षण विभागाच्या निर्देशानुसार गुरुवारी शाळेला भेट दिली, ते म्हणाले, मी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, मुख्याध्यापिका, इतर कर्मचारी आणि स्थानिक लोकांची भेट घेतली आहे. त्यांना जुनी इमारत पाडून तिचे नूतनीकरण करायचे आहे, जेणेकरून मुलांना वर्गात जाण्याची भीती वाटू नये.

Tags

follow us