Download App

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती Devisingh Shekhawat यांचे निधन

  • Written By: Last Updated:

देशाच्या माजी पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ( Pratibha Patil ) यांचे पती देवीसिंह शेखावत ( Devisingh Shekhawat) यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर पुण्याच्या केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

देवीसिंह शेखावत गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्या तब्येतीमध्ये काही सुधारणा होत नव्हती. अखेर त्यांचे आज सकाळी 9.30 वाजता निधन झाले. त्यांच्यावर आज सायंकाळी 6 वाजता पुणे येथे अंत्यसंस्कार होणार आहे.

(हातात तलवारी, बंदुका घेऊन पोलिस स्टेशनवर हल्ला, Khalistan आंदोलन पुन्हा पेटले)

Tags

follow us