Dharmendra Pradhan On Congress : चर्चेसाठी तयार पण त्यांनी राजकीय तमाशा निवडला; राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान स्पष्टच बोलले

Dharmendra Pradhan On Congress : नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील

Dharmendra Pradhan On Congress

Dharmendra Pradhan On Congress

Dharmendra Pradhan On Congress : नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर हजारो विद्यार्थी आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करत मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याचबरोबर राहुल गांधी यांनी देखील पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर आता या संपूर्ण प्रकरणात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकरणात प्रतिक्रिया देत राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस विद्यार्थ्यांना राजकीय साधन म्हणून वापरत असल्याचा आरोप धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री (Dharmendra Pradhan) एक्सवर म्हणाले की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस (Congress) संसदेच्या पावसाळी अधिवेशनादम्यान अशांतता निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना निर्लज्जपणे राजकीय साधन म्हणून वापरत आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेसने सुरक्षा नियमांचे उल्लंघन करुन पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन कले ज्यामुळे जनतेला गैरसोय झाली असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

पुढे बोलताना मंत्री प्रधान म्हणाले की, सरकारची सर्वसमावेशक चर्चा करण्याची इच्छा असूनही काँग्रेसने लोकशाही चर्चेऐवजी राजकीय तमाशा निवडला. विद्यार्थ्यांच्या समस्यांवर तोडगा काढणे हे त्यांचे ध्येय नसून राजकीय लक्ष वेधण्यासाठी अशांतता निर्माण करणे हे मुख्यम ध्येय आहे. राहुल गांधीसाठी हा विद्यार्थ्यांचा प्रश्न नाही तर चर्चेचे सर्व संभाव्य मार्ग खुले झाल्यानंतर संघर्ष निर्माण करण्याचा हा मुद्दा आहे.

पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

नीट (NEET) परीक्षेबाबत चर्चा करण्यास आणि तरुणांच्या प्रत्येक रास्त शंकेचे निरसन संसदेच्या सभागृहात करण्यास आमचे सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. राजकीय मोहिमेत केवळ ‘साधन’ किंवा ‘मोहरा’ म्हणून वापरले जाण्यापेक्षा भारतीय विद्यार्थी अधिक चांगल्या वागणुकीस पात्र आहेत. त्यांना गोंधळाऐवजी निश्चितता, घोषणाबाजीऐवजी उपाय आणि व्यत्ययाऐवजी जबाबदारीची अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांप्रती केवळ संताप व्यक्त करणे पुरेसे नाही; त्यांना उत्तरे, सुधारणा आणि उत्तरदायित्व मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे. आणि नेमके तेच पूर्ण करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे असं धर्मेंद प्रधान यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version