Download App

Diesel Vehicles महागणार! 10 टक्के अतिरिक्त जीएसटी लावण्याची गडकरींची अर्थ मंत्रालयाकडे मागणी

  • Written By: Last Updated:

Diesel Vehicles : तुम्ही जर डिझेल गाड्या वापरत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण आता डिझेल गाड्यांवर 10 टक्के अतिरिक्त जीएसटी लागणार आहे. त्यामुळे आता डिझेल गाड्या महागणार असल्याचं बोललं जात आहे. डिझेल गाड्यांच्या विक्रिवर अंकुश लागण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी तशी मागणी अर्थ मंत्रालयाकडे केली आहे. ते आज मंगळवारी 12 सप्टेंबरला दिल्लीमध्ये 63 व्या सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या वार्षिक संमेलनात बोलत होते.

Gaurav More: ‘हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे ‘परिनिर्वाण’ सिनेमात साकारणार ‘ही’ भूमिका

काय म्हणाले नितिन गडकरी?

या कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, डिझेल गाड्यांवर 10 टक्के अतिरिक्त जीएसटी लावण्यात यावा. मी अगोदरच तसा मसुदा तयार केला आहे. तसेच यावर आज अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. कारण डिझेल गाड्यांमुळे जास्त प्रदुषण वाढत आहे. तर डिझेल गाड्यांना हळूहळू बंद करण्याचा हा एकच मार्ग आहे.

‘थोडं थांबा, पाकव्याप्त काश्मीर आपोआप भारतात येईल’; माजी लष्करप्रमुखांचा दावा

तसेच गडकरी पुढे म्हणाले की, खरंतर डिझेल गाड्या बनवण्यातच येऊ नये. कारण डिझेल गाड्यांमुळे जास्त प्रदुषण वाढत आहे. तसेच त्यांनी यावेळी ऑटोमोबाईल कंपन्यांना इशारा देखील दिला की, सरकार डिझेल गाड्यांवरील कर इतका वाढवेल की, कंपन्यांना गाड्या विकणे अवघड होऊन जाईल. गडकरी यांच्या या विधानामुळे आता वाहन धारक आणि कंपन्यांची धास्ती वाढली आहे.

दरम्यान केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी हे गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रीक वाहन आणि पेट्रोल डिझेलच्या वापरावर निर्बंध यावेत अशी मागणी करत आहेत. तसेच ते नेहमीच पर्यावरणपूरक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देताना दिसतात. त्यात आता त्यांनी डिझेल गाड्यांच्या विक्रिवर अंकुश लागण्यासाठी थेट डिझेल गाड्यांवर 10 टक्के अतिरिक्त जीएसटी लावण्याची मागणी केली आहे. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर ऑटोमोबाईल कंपन्यांचे शेअर कोसळले आहेत.

Tags

follow us