Gaurav More: ‘हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे ‘परिनिर्वाण’ सिनेमात साकारणार ‘ही’ भूमिका

Gaurav More: ‘हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे ‘परिनिर्वाण’ सिनेमात साकारणार ‘ही’ भूमिका

Parinirvaan Movie: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या शोच्या माध्यमातून चाहत्यांना कायम खळखळवून हसवणारा सर्वांच्या लाडक्या गौरव मोरेचे नशीब पुन्हा एकदा फळफळलं आहे. गौरव मोरे (Gaurav More) लवकरच नवीन सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जीवनावर आधारित ‘परिनिर्वाण’ सिनेमामध्ये (Parinirvaan Movie) गौरव मोरे महत्वाची भूमिकेत बघायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gaurav More (@im_gaurav_more20)


मराठमोळे अभिनेते आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी ‘परिनिर्वाण’ सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. या सिनेमामध्ये प्रसाद ओक मुख्य भूमिका साकारणार असल्याचे सांगितले आहे. आता या सिनेमामध्ये गौरव मोरे महत्वाची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आली. गौरव श्यामरावची भूमिका साकारणार आहे. गौरव मोरे याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सिनेमाच्या स्क्रिप्टचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टला त्याने कॅप्शनमध्ये ‘एक नवीन सुरुवात’ , असं लिहिल्याचे बघायला मिळत आहे.

गौरव मोरेच्या या पोस्टला त्याच्या चाहत्यांनी मोठी पसंती दिली आहे. तो ‘परिनिर्वाण’ सिनेमात दिसणार असल्यामुळे त्याचे चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहे. त्यांनी कमेंट करत गौरव मोरेचे तोंडभरून कौतुक केल्याचे बघायला मिळत आहे. गौरवच्या एका चाहत्याने कमेंटमध्ये असे लिहिले आहे की, ‘नशीब काढलं भावा… खरंच नशीब काढलं बाबासाहेब यांच्यावर आधारलेल्या सिनेमात भूमिका घेतोय…आम्ही नक्की बघायला येणार’ तर, आणखी एका चाहत्याने कमेंट करत असे सांगितले आहे की, ‘गौऱ्याभाई फुल्ल फॉर्ममध्ये….’

Akshay Kumar: खिलाडीने केलं किंग खानचं तोंडभरून कौतुक, म्हणाला…

तसेच धर्मवीरच्या यशानंतर प्रसाद ओक लवकरच ‘परिनिर्वाण’ घेऊन चाहत्यांच्या भेटीला येत आहे. गेल्या काही दिवसापासून या सिनेमाचे मोशन पोस्टर प्रसाद ओकने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले होते. दरम्यान ६ डिसेंबर १९५६ दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निधन झाले होते. महामानवाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी लाखोंचा जनसागर रस्त्यावर उतरला होता. देशाचा श्वास रोखून धरणारा हा क्षण नामदेव व्हटकर यांनी चित्रित गेल्याचे सांगितले जात आहे. जवळपास ३००० फुटांची रिळ नामदेव व्हटकर यांनी तयार केली. त्यांच्यामुळे आज आपण परिनिर्वाणाची दृश्य बघू शकतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube